• Sun. Sep 22nd, 2024

कर्नाटकहून येताच शरद पवारांचा घणाघात, शेवगावच्या घटनेचा उल्लेख करत शिंदे-फडणवीसांवर निशाणा

कर्नाटकहून येताच शरद पवारांचा घणाघात, शेवगावच्या घटनेचा उल्लेख करत शिंदे-फडणवीसांवर निशाणा

Sharad Pawar On Shevgaon Incident Ahmednagar News : कर्नाटकातील नव्या सरकारच्या शपथविधीहून परतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील पहिल्याच जाहीर कार्यक्रमात कर्नाटक निवडणुकीचा दाखला दिला. तेथील जनतेच्या एकजुटीचे कौतुक करताना भाजपवर टीका केलीच.

 

Sharad Pawar News
कर्नाटकहून येताच शरद पवारांचा घणाघात, शेवगावच्या घटनेचा उल्लेख करत शिंदे-फडणवीसांवर निशाणा
अहमदनगर : कर्नाटकमधील जनतेच्या एकजुटीप्रमाणे इतर राज्यांतही अशीच एकजूट होईल हे पहावे लागेल. कर्नाटकात आता सामान्य माणसाचे सरकार आले आहे. तेथील सामान्य माणसाने, कष्टकऱ्यांनी जे करून दाखविले, ते काम आता इतर राज्यात करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी मंहामंडळाचे द्वैवार्षिक अधिवेशन रविवारी नगरमध्ये झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे पवार बोलत होते. कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, आमदार प्राजक्त तनपुरे, पद्मश्री पोपटराव पवार, माजी आमदार दादा कळमकर, डॉ. सर्जेराव निमसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शपथ घेताच शरद पवारांच्या पाया पडले अन् आशीर्वाद घेतला, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार चर्चेत
कर्नाटकमधील नव्या सरकारचा काल शपथविधी झाला. त्यावेळी पवार उपस्थित होते. शपथ घेताच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे पवार यांचे पाया पडले होते. याची चर्चा सुरू असताना दुसऱ्याच दिवशी राज्यातील पहिल्या जाहीर कार्यक्रमात पवार यांनी कर्नाटक पॅटर्नचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, कर्नाटकमधील नव्या सरकारच्या शपथविधीसाठी मी काल बंगळुरूला होतो. तेथे आता सामान्य जनतेचे नवे सरकार आले आहे. आधीच्या सरकारने माणसामाणसांत विदि्वेष वाढवायचे काम केले होते. तरीही अनेकांना वाटत होते की या निवडणुकीत तेथील सत्ताधारी पक्ष पुन्हा जिंकणार. मात्र, सामान्य माणसांनी एकजूट केली आणि चित्र बदलले. याची झलक शपथविधी सोहळ्यातही पाहायला मिळाली. या सोहळ्याला सुमारे एक लाख लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे यामध्ये ७० टक्के लोक विविध जातीधर्माचे आणि तरुण होते. तेथील कष्टकऱ्यांनी जी एकजूट दाखविली, त्यामुळे हे घडले. जर कर्नाटकात अशी एकजूट होऊ शकते, तर आता अन्य राज्यात कशी होत नाही हे आपल्याला पहावे लागेल, असेही पवार म्हणाले.
राज ठाकरेंसह राष्ट्रवादीला देवेंद्र फडणवीसांचा टोला, ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा आहेत…
अहमदनगर जिल्ह्याबद्दल बोलताना ते म्हणाले, हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. येथे सर्व घटकांसाठी काम करणारे नेते होऊन गेले. कष्टकऱ्यांचे नेते शंकरराव घुले यांनीही या क्षेत्रात मोठे काम केले. त्यामुळेच आज त्यांच्या पुतळ्याचे येथे अनावरण होत आहे. त्यांच्यावरील स्मरण ग्रंथही प्रकाशित होत आहे. मात्र, अशा जिल्ह्यातही आता काही शक्ती वातावरण बिघडवत आहेत. मी पेपरमध्ये वाचले की याच नगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये एका घटनेमुळे दोन तीन दिवस बाजारपेठ बंद होती. जाती धर्मातील अंतर वाढविले जात आहे. संघर्ष होत आहे. हे वाढविण्याचे काम काही शक्ती करीत आहेत. त्यांच्याविरूद्ध लढा देण्याचे काम आपल्यासमोर आहे. हा लढा देणाऱ्यांना कष्टकऱ्यांची साथ हवी. जर हे काम केले नाही तर कष्टकऱ्यांचे जीवन उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed