बारामती : शहरातील हरिकृपानगर इथे एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून २ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. युवराज रोहिदास बेंद्रे व शांतिलाल शिवाजी बेंद्रे (रा. कर्जत, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातील दोन महिलांची पोलिसांकडून सुटका कऱण्यात आली.हरीकृपानगर या चांगल्या भागात एका अपार्टमेंटमधील सदनिकेत हा व्यवसाय केला जात होता. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यांनी निर्भया पथकासह त्यांच्याकडील अधिकारी कर्मचाऱ्यांना साध्या गणवेशात शहर पोलीस ठाण्यात पाठवले.
पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना सूचना करत कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार महाडिक यांच्यासह उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख, सपोनि प्रकाश वाघमारे, कर्मचारी अक्षय सिताफ, कल्याण खांडेकर, दशरथ जामदार आदींनी तेथे बोगस ग्राहक पाठवला आणि पंचांना पाचारण करण्यात आले. पाचशे रुपयांच्या तीन नोटा त्याच्याकडे देण्यात आल्या. बोगस ग्राहक त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने आरोपींशी संपर्क साधला. त्यांनी वेश्यागमनासाठी महिला पुरविण्याचे मान्य केले.

यावेळी बोगस ग्राहकाने पोलिसांना मिस कॉल करत इशारा केल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईत बोंद्रे यांच्यासह दोन महिलांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. घटनास्थळी घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे ६९०० रुपये मिळून आले. तसेच ३० हजार रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आरोपींविरोधात अनैतिक मानवी व्यापार अधिनियम व भारतीय दंडविधानानुसार गुन्हा दाखल केला.