• Mon. Nov 25th, 2024
    Weather News : राज्यात अवकाळी पावसाचा हाहाकार, ऐन उन्हाळ्यात नदीला पूर, अतिवृष्टीमुळे ३५ घरं उद्ध्वस्त

    नंदुरबार : राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत आहे तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने कहर केला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील रापापुर इथे तुफान वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून तुफान वाऱ्यामुळे ३५ हून अधिक आदिवासी कुटुंबांचे घरांचे नुकसान झालं आहे.घरावर असलेले पत्रे, छतदेखील उडाले आहेत. त्यातच घरात साठवून ठेवलेले धान्य इतर संसार उपयोगी वस्तू हे पूर्ण पाण्यात भिजली असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील रापापुर परिसरात आज झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला. त्यातच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक झाडेही कोलमडून पडली आहेत.

    Monsoon update: मान्सूनची Good News, उशिराने नाही तर ‘या’ तारखेला येणार, वाचा IMD चा अंदाज
    वादळात मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस झाल्याने शेतात पाणी शिरलं आहे. यातच घराचे नुकसान झाले असून आदिवासी कुटुंब हे आता उघड्यावर आले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी झाल्याने आदिवासी हताश झाले आहेत. वादळी वाऱ्यांमुळे घरांचे आणि विजेचा खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    विजेचे खांब कोसळल्याने परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. यातच वादळात घराचे नुकसान झालेल्यांना लवकरात लवकर पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी मागणी आता आदिवासी कुटुंब करू लागले आहेत.

    Dhirendra Shastri: …तर बागेश्वर बाबांना २ कोटींचे हिरे वाहीन, सुरतच्या व्यापाऱ्याचं ओपन चॅलेंज; धीरेंद्र शास्त्री दाखवणार का चमत्कार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed