• Mon. Nov 25th, 2024
    गरम दुधाच्या कढईत पडली अन्…, ६ वर्षाच्या चिमुकली २१ दिवस मृत्यूशी लढली; अखेर घेतला जगाचा निरोप

    बुलडाणा : ‘जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला’ असं म्हटलं जातं. हीच म्हण अधोरेखित करणारी घटना मलकापूर इथे घडली आहे. उकळलेल्या दुधाच्या कढईमध्ये पडून भाजलेल्या आणि ३ आठवडे साक्षात मृत्यूची झुंज देणाऱ्या सहा वर्षे चिमुकलीने अखेर बुधवारी जगाचा निरोप घेतला. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हनुमान चौकातील डेरीचे संचालक युवराज जाधव नांदुरा रस्त्यावरील जाधव वाडीत वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराच्या आवारात व्यवसाय निरूप दैनंदिन प्रमाणे मोठ्या भांड्यात दूध उकळून मोठ्या कढईत ठेवण्यात आले होते. २७ एप्रिल रोजी त्यांची सहा वर्षे कन्या ओमश्री ही इतर मुलांसह खेळताना बागडताना अनावधानाने ती दुधाच्या कढईत पडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर घरच्यांनी तात्काळ तिला बाहेर काढून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले.

    Dhirendra Shastri: …तर बागेश्वर बाबांना २ कोटींचे हिरे वाहिन, सुरतच्या व्यापाऱ्याचं ओपन चॅलेंज; धीरेंद्र शास्त्री दाखवणार का चमत्कार
    तिथे प्राथमिक उपचारानंतर तिला परत पाठविण्यात आले. मात्र, जाधव कुटुंबियांनी गंभीर जखमी ओमश्रीला जळगाव खान्देशात हलविले. यानंतर लगेच मुंबई येथील रुग्णालयात हलण्यात आले. त्या ठिकाणी ओमश्रीवर उपचार सुरू होते. एकापाठोपाठ एक शास्त्रक्रिया करण्यात आल्या पण तरीदेखील तिची तब्येत सुधारली नाही.

    खरंतर, तिची उपचार सुरू असताना साक्षात मृत्यूची झुंज सुरू होती. मात्र, बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास तिची मृत्यूशी झुंज संपली आणि तिने जगाचा निरोप घेतला. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आपले चिमुकले नेमकं कसे काय खेळतात? याकडे पालकांनी डोळ्यांत तेल घालून दक्ष राहणं गरजेचे आहे.

    Triple Murder: आई-वडील अन् आजीचा हॉकी स्टिकने खून, ४८ तास मृतदेह सॅनिटायझरने जाळला; मस्त शॉपिंग केली अन्…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed