नवी मुंबई : पती-पत्नी म्हटलं की वाद आलेच. लहान-मोठ्या वादातून अनेकदा टोकाचे निर्णय घेतले जातात. नवी मुंबईत पती-पत्नीतील वाद विकोपाला गेला आणि घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील कळंबोली येथील पती-पत्नीचे काही ना काही कारणांवरुन सतत वाद होत होते. या वादाला कंटाळून पत्नीने पतीला कायमचं संपवल्याची घटना घडली आहे.ज्याच्या सोबत सात फेरे घेतले, संपूर्ण आयुष्य एकत्र राहण्याचा निर्णय घेतला त्याच जोडीदाराचं जीवन संपवण्यासाठी पत्नीने पंजाबवरुन मारेकरी बोलावले होते. पतीची हत्या करण्यासाठी पत्नीने वीस लाखांची सुपारी आरोपींना दिली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेदरम्यान, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पतीने पत्नीला तिच्या वागण्यावरुन तसंच इतर काही कारणांवरुन पैसे देण्याचं थांबवलं होतं. त्यावरुन सतत दोघांमध्ये वाद होत होते. या महिलेचं माहेर पंजाबमध्ये असल्याची माहिती असून तिने तिथेच पतीच्या हत्येचा कट रचल्याची माहिती आहे.
मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार
नवी मुंबईतील कलंबोळी परिसरात एका गार्डनमध्ये ८ मे रोजी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. मृत व्यक्तीची ओळख पोलिसांनी पटवली आणि तपास सुरू केला. सीसीटीव्ही आणि काही प्रत्यक्षदर्शी आणि तांत्रिक मदतीच्या आधारे धक्कादायक बाब समोर आली. तपास थेट मृत व्यक्तीच्या घरात जाऊन थांबला. मृत व्यक्तीचे आपल्या पत्नीसोबत अनेकवेळा काही ना काही कारणांनी खटके उडत होते. शेवटी पत्नीने पंजाब मधील दोघांना २० लाखांची सुपारी दिल्याचं निष्पन्न झालं.
Akola News: वडिलांकडून आईला मारहाण, सोडवण्यासाठी गेलेल्या लेकावरही हात उचलला; नंतर मुलाच्या हातून भयंकर कृत्य
दोन्ही आरोपींना दिल्लीला पळून जाताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पत्नीसह तिघांनाही अटक केली आहे. अधिक तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस करत आहेत. महिलेच्या पत्नीचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. त्याच्या हत्येची सुपारी पत्नीनेच दिल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
धुळ्याहून सुरतला वाहतूक, बसमध्ये ठेवलेल्या गोण्यांवर संशय; तपासात पोलिसही चक्रावले
पती पत्नीचं नातं एकमेकांच्या जीवाला जीव देणार असतं. संकटात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणारं असं असतं, मात्र नवी मुंबईतील या पत्नीने पतीला संपवण्यासाठी दोन लाखाची सुपारी दिल्याच्या घटनेने संपूर्ण नवी मुंबई परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.