• Sat. Sep 21st, 2024

डिझेलच्या टाकीचा मोठा स्फोट; वेल्डिंग काम करताना झालेल्या चुकीने एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर

डिझेलच्या टाकीचा मोठा स्फोट; वेल्डिंग काम करताना झालेल्या चुकीने एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर

नागपूर : कपिलनगर पोलीस ठाण्यांतर्गत मारुती शोरूमजवळ भीषण अपघात झाला. डिझेल टँकरमध्ये वेल्डिंग करताना धूर जमा झाला आणि त्याचा स्फोट झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तकदीर सुखदेव कांबळे (वय ३५, रा.जगदंबा नगर खसाळा)असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सकाळी ११.३० वाजता ऑटोमॅटिक चौकात हा अपघात झाला.मिळालेल्या माहितीनुसार, ऑटोमोटिव्ह चौकाजवळील एस एस बॉडी शॉप नावाचा वेल्डिंगच्या दुकानात सुखबाजसिंग चहल आणि तकदीरराज सुखदेव कांबळे हे ट्रकच्या डिझेल टाकीची साफसफाई आणि वेल्डिंगचे काम करत होते. दरम्यान, डिझेलच्या टाकी कापुन सफाई करत असताना, टाकीचे नॉब बंद असल्यामुळे टाकीत धूर जमा झाला आणि त्यात मोठा स्फोट झाला. त्याचवेळी स्फोटामुळे टाकी साफ करणारा कामगारा तकदीरराज सुखदेव कांबळे याचा मृत्यू झाला तर वेल्डिंग दुकानाचा मालक हा सुध्दा गंभीर जखमी झाला आहे.

स्फोट इतका जोरदार होता की, दूरवर उभे असलेले इतर दोघे जण गंभीर जखमी झाले.तसेच अन्य दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर होप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, सुयोग नगर येथील योगेश गणेश नटाळे (वय ३५) यालाही किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह कपिलनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

सुखचंदसिंग बलविंदरसिंग गुल्हार (२७, दीपक नगर), सुखबाजसिंग चहल (४९, बाबा बहूदर नगर, पाचपावली) आणि योगेश गणेश गवळे (३५, सहयोग नगर) अशी जखमींची नावे आहेत. सध्या जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed