अकोला : शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत १३ मे रोजी अकोल्यात दोन गटात झालेल्या हिंसक मारामारीत आपला जीव गमावलेल्या ३९ वर्षीय विलास गायकवाड यांच्या कुटुंबीयांना दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात त्यांचा फोटो पाहूनच त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. कुटुंबातील एकमेव कमावणारा, इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा गायकवाड, शनिवारी (१३ मे) रोजी रात्री घरी परतत असताना सोशल मीडिया पोस्टवर दोन समुदायांमधील हिंसाचाराच्या वेळी त्याच्यावर दगड आणि पाईपने वार करण्यात आले. आम्ही रविवारी एका स्थानिक वृत्तपत्रात त्याचे छायाचित्र बघेपर्यंत आम्हाला त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली नव्हती. आम्हाला फक्त हे माहित होते की तो जखमी आहे आणि रुग्णालयात आहे. आम्ही सकाळी शासकीय रुग्णालयात धाव घेतली जेथे आम्ही त्याचा मृतदेह पाहिला, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे.विलास गायकवाड…. अकोल्यातील हरिहरपेठ भागातील विलासचं घर आता पार सुनंसुनं झालंय… विलास ईलेक्ट्रीशियनचं काम करून आपल्या संसाराचा गाडा हाकायचे. मात्र, शनिवारी (१३ मे) दुपारी ४ वाजता कामावर गेलेले विलास गायकवाड नंतर घरी परतलेच नाहीत. नंतर दुसऱ्या दिवशी घरी पोहोचलं ते त्यांचं पार्थिवच…
भाऊ गेला, विधवा वहिनीशी लग्नाचा निर्णय, तिच्या लेकरांनाही सांभाळणार, जळगावच्या राहुलची डोंगराएवढी मोठी गोष्टशनिवारी दुपारी ४ वाजता विलास एका ईलेक्ट्रिक फिटींगच्या कामासाठी जातो असं सांगून गेले. याचवेळी संध्याकाळी १० च्या सुमारास ते घरी परतत होते. याचवेळी हरिहरपेठ भागात दंगेखोरांचा मोठा हैदोस सुरू होताय. बेफाम दंगेखोरांनी विलास यांच्या डोक्यात दगड घातला. अन तिथेच सारं संपलं.
काय घडलं होतं नेमकं अकोल्यात?
अकोला शहरातील जूने शहर भागात सोशल मीडियावरील आक्षेपार्ह संवादामुळे १३ मे रोजी दोन गटात तूफान दगडफेक झाली होती. शेकडो लोक अमोरासमोर आले असून दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत होते. दोन गटात झालेल्या तुफान दगडफेक आणि दंगलीमध्ये एकाचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले होते तर ३० लोक किरकोळ जखमी झाले.
रेल्वेत चढताना हात निसटला; समोर साक्षात मृत्यू पाहिला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
यामध्ये दोन पोलिस जखमी झाली असून जखमींमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. अनेक वाहनांची तोडफोड देखील झाली असून त्यात चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोळ-जाळफोळ झाली आहे. अनेक घरांचं देखील नुकसान झालं होतं.
काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोळ करून काही घरांना आग लावल्यानं दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, म्हणून पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत अश्रुधुराच्या कांड्या अन् हवेत गोळीबार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. आता परिस्थिती नियंत्रणात असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं अकोला पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.