जळगाव : पारोळा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी मंगळवारी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण राजेंद्र सपकाळे (वय २२ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अल्पवयीन मुलीचे अचानक पोट दुखायला लागल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे जाऊन तपासणी केल्यावर ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्याने मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.पारोळा तालुक्यातील एका गावात एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रवीण राजेंद्र सपकाळे याने पीडित मुलगी घरी एकटी असताना तिच्यावर वारंवार अत्याचार केला. वेगवेगळ्या पध्दतीने धमकी देत त्याने मुलीवर तिच्या घरी तसेच स्वत:च्या घरी पिडीत मुलीवर अत्याचार केले. हा प्रकार कोणाला सांगितला तर बहिणीवरसुद्धा अत्याचार करेन अशी धमकीच प्रवीण याने पिडीत मुलीला दिली होती.
प्रसिद्ध नर्तकी गौतमी पाटीलला जिल्हा बंदी करा, तिच्यावर गुन्हा दाखल करा; या राजकीय पक्षाने केली मागणीमुलीच्या कुटुंबीयांना बसला मोठा धक्काया धमकीला घाबरुन पीडितेने हा प्रकार कुणालाच सांगितला नाही. पीडितेवर प्रवीण हा वेळावेळी अत्याचार करत राहिला. दरम्यान, मंगळवारी सकाळी पीडित मुलीच्या पोटात अचानक दुखायला लागलं. ही बाब मुलीने तिच्या मोठ्या बहिणीला सांगितली. त्यानुसार बहिणीसह तिच्या कुटुंबीयांनी पीडित मुलीला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केली. एका तपासणीत पीडित मुलगी ही गर्भवती असल्याचे समोर आले. हे ऐकून मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
हृदयद्रावक! त्याही चिमुकलीचा मृत्यू, बापानेच रागाच्या भरात दिले होते उंदीर मारायचे औषध
पीडितेला विश्वासात घेऊन कुटुंबीयांनी तिची विचारपूस केली. तेव्हा प्रवीण सकपाळे याने आपल्याला वेळावेळी धमकी देत आपल्यावर अत्याचार केल्याची आपबिती तिने कथन केली. धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पीडितेला सोबत घेऊन तिच्या कुटुंबीयांनी पारोळा पोलीस स्टेशन गाठले. याठिकाणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित प्रवीण राजेंद्र सपकाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामतीत खळबळ! साडेतीन वर्षांच्या बालकावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, महिन्याभरात दोन हल्ले
पोलीस उपअधीक्षक ऋषीकेश रावले यांनी पोलीस ठाण्यात भेट देत माहिती जाणून घेतली. तसेच संशयिताला तत्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित प्रवीण सपकाळे यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजीव जाधव करीत आहे.