• Fri. Mar 13th, 2026
    Pune Video: कारवाईसाठी अधिकारी येताच फेरीवाल्यांकडून जीवघेणा हल्ला, धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद

    पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील ढोले पाटील रोडवर अतिक्रमण कारवाई करताना अतिक्रमण निरीक्षक आणि सुरक्षा रक्षकाला नागरिकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात अनधिकृत फेरीवाले वाढले असल्यामुळे परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळते. यासाठी फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना हा प्रकार घडला आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही मारहाण करण्यात आली. कारवाई करण्यासाठी आल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी अतिक्रमण निरीक्षक आणि सुरक्षारक्षक यांना इतकी मारहाण केली की ते यामध्ये जखमी असल्याची माहिती आहे.

    धक्कादायक! कुत्रा चावला तरी केलं दुर्लक्ष, अखेर २ महिन्यांनी तरूणासोबत असं घडलं की वाचून हादराल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *