• Sat. Sep 21st, 2024

Pune News : फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांची घेतली शाळा; प्रदेश आणि शहर भाजपमध्ये होणार मोठे बदल?

Pune News : फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांची घेतली शाळा; प्रदेश आणि शहर भाजपमध्ये होणार मोठे बदल?

पुणे : आधी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत हक्काची असणारी जागा भाजपने गमावली. त्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत देखील भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता भाजप राज्यात अॅक्शन मोडवर आली आहे. त्या अनुषंगानेच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात एक बैठक घेतली आहे. या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर शहर भाजपात मोठी खांदेपालट होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसारच आज देवेंद्र फडणवीस यांनी आमदार, पदाधिकारी यांचा सगळा अहवाल घेतला. आणि सगळ्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. देवेंद्र फडणवीस हे आज पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील सर्किट हाऊस येथे पदाधिकारी, आमदारांची एक बोलावली होती. या बैठकीत फडणवीस यांनी सगळ्यांच्या कामाचा लेखाजोखा घेतल्याची माहिती आहे.

दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अद्दल घडवणार; अकोला, शेवगावातील दंगलींनंतर देवेंद्र फडणवीसांचा सज्जड इशारा
येत्या आठ दिवसांत प्रदेश आणि शहर भाजपमध्ये मोठे बदल होणार असल्याची माहिती खात्रीलाय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पुण्यामध्ये १८ तारखेला भाजपच्या कार्यकरणीची बैठक होत आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डाही उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी देखील ही बैठक महत्त्वाची मनाली जात आहे. दुसरीकडे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पालिका निवडणुका लागू शकतात, अशी शक्यता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे भाजपने या बैठकीपासूनच निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.

Chinchwad News: अजित दादांच्या हस्ते भूमिपूजन; फडणवीसांकडून उदघाटन, चिंचवडमध्ये ‘युती’ पॅटर्नची चर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed