• Tue. Nov 26th, 2024

    नवऱ्याने बायकोला रक्ताच्या थारोळ्यात पडेपर्यंत मारलं; चेहऱ्याची अवस्था न बघवण्यासारखी

    नवऱ्याने बायकोला रक्ताच्या थारोळ्यात पडेपर्यंत मारलं; चेहऱ्याची अवस्था न बघवण्यासारखी

    भिवंडी : पत्नी रात्रीच्या सुमारास असताना पतीकडून राहत्या घरातच तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कल्याण – पडघा मार्गावरील बापगावात घडली आहे. याप्रकरणी गंभीर जखमी पत्नीच्या भावाने हल्लेखोर पतीविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांनी राजकीय दबावाखाली आरोपीवर भादंवि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल न करता ३२६, ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचा आरोप तक्रारदार भावाने केला आहे. गणेश सुरेश चव्हाण (वय ४३) असे तक्रारदार भावाचे नाव आहे. तर प्रकाश शंकर पाटील ( वय ४५) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर पतीचे नाव आहे. तसेच सपना (वय ३९) असे प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे.

    मुलाचा चेहरा माझ्यासारखा दिसत नाही; पतीला संशय, पत्नीचा जीव घेतला; चार वर्षांचा चिमुरडा देणार साक्ष

    तक्रारदार गणेश हे कल्याण पूर्वेत राहत असून त्यांची बहिणी सपना हिचा विवाह २००७ साली आरोपी पती प्रकाश पाटील याच्याशी झाला असून त्यांना एक चार वर्षाचा मुलगा आहे. त्यातच १३ मे रोजी पत्नी सपना ही बापगाव मधील राहत्या घरात रात्रीच्या सुमारास झोपली असता कुठल्या तरी कारणावरून हल्लेखोर आरोपी पतीने अचानक पत्नीवर लाकडी दांडक्याने हल्ला करून तिला रक्ताच्या थारोळ्यात पडेपर्यत बेदम मारहाण करत राहिला. सपना यांच्या किंचाळण्याचा, ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेऊन सासू नणंदच्या मदतीने त्यांना गंभीर जखमी अवस्थेत कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तक्रारदार गणेशला आरोपी पतीच्या नातेवाईकांनी बहीण सपना रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच रात्रीच भाऊ रुग्णालयात पोहचला. त्यावेळी सपनाची सासू आणि नणंद बापगावला येथील आपल्या घरी निघून गेल्या.

    पप्पांनी मम्मीला चाकू मारला, मग स्वत:ला मारुन घेतलं! चिमुकलीचा जबाब ऐकून पोलीस सुन्न

    दरम्यान, रविवारी १४ मे रोजी गणेशने पडघा पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या प्राणघातक हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पती विरोधात भादंवि कलम ३२६, ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला राजकीय दबावापोटी पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदार गणेशने केला आहे. वास्तविक सपनावर प्राणघातक हल्ला करूनही पोलिसांनी ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला नसल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. सध्या पत्नीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे येथील डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तर संदर्भात पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साबळे यांच्याशी संपर्क साधला असता, डॉक्टरकडून मारहाणीचा अहवाल आल्यानंतर तपास करून पुढील कारवाई करून वाढीव कलम लावण्यात येणार असल्याचे सांगितले.

    अमरावतीत तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed