• Sat. Sep 21st, 2024
उत्तर महाराष्ट्र तापला; उष्माघाताने दोन बळी; राहुरीमध्ये शेतकऱ्याचा, तर जळगावात महिलेचा मृत्यू

जळगाव : उन्हाचा तडाखा वाढत असून, जळगावचे तापमान ४५ अंशांवर गेले आहे. तर नाशिकमध्ये ३८.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. नाशिक तालुक्याच्या सीमेवरील राहुरी येथे शेतकऱ्याचा शनिवारी, तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील महिलेचा शुक्रवारी उष्माघाताने मृत्यू झाला.

शेतकऱ्याचा मृत्यू

देवळाली कॅम्प : गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढत आहे. अशातच आपल्या शेतात पाणी देत असताना नाशिक तालुक्याच्या सीमेवरील राहुरी येथील ५५ वर्षीय शेतकरी साहेबराव शांताराम आव्हाड यांचा गुरुवारी उष्माघाताने मृत्यू झाला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आव्हाड गुरुवारी पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. त्यांना दुपारी तीनच्या सुमारास भोवळ आली. त्यांचा भाऊ गोरखनाथ आव्हाड यांनी कँटोन्मेंट रुग्णालयात दाखल केले असता निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा होनराव यांनी त्यांना मृत घोषित केले.

दोन सामने, चार संघ आणि दोन टीम्स IPL 2023 बाहेर, गुणतालिकेत कोणते मोठे बदल झाले पाहा…
उष्णतेची लाट कायम

जळगाव : जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून, शनिवारी जळगावचे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. लग्न समारंभास गेलेल्या अमळनेर येथील रूपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय ३३) या विवाहितेचा शुक्रवारी मृत्यू झाला. या महिलेस उष्माघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. लग्न आटोपून गुरुवारी सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना अचानक मळमळ व उलट्या सुरू झाल्या. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला.

अकोल्यात विक्रमी तापमान

गेल्या तीन ते चार दिवसांत विदर्भातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. अकोला शहरासह विदर्भातील इतरही जिल्ह्यात तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सियसभोवती फिरत होता. शनिवारी तापमानाने उच्चांक गाठला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कमाल तापमान ४५.६ अंश डिग्री सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. जगातील सर्वाधिक तापमानाच्या यादीत अकोल्याचे नाव आजच्या या तापमानाच्या उच्चांकामुळे आलं आहे.

नांदेडमध्ये उष्मघाताचा पहिला बळी, २८ वर्षीय युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, हृदयविकाराचा झटकाही आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed