• Sat. Sep 21st, 2024

जिवगलांनी सोडले, पण अपक्षाने शेवटपर्यंत साथ दिली, ठाकरे भावुक, म्हणाले लढणारा सैनिक मिळाला

जिवगलांनी सोडले, पण अपक्षाने शेवटपर्यंत साथ दिली, ठाकरे भावुक, म्हणाले लढणारा सैनिक मिळाला

अहमदनगर : एका बाजूला सर्वोच्च न्यायालयामुळे राज्यात राजकीय आणि कायद्याचा किस पाडला जात असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट आपल्या एकनिष्ठ शिलेदाराच्या घरी पोहोचले. सहकुटुंब भेट घेत एकत्र जेवणही घेतले. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून ठाकरे यांनी ही भेट दिली.आपले एकनिष्ठ शिलेदार माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे कौतूक केले. यशवंतराव गडाखांनी मला लढणारा सैनिक दिला. अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या गडाख कुटुंबाला आपण कदापी विसरणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपलं मन मोकळं केलं. यावेळी ठाकरे -गडाख कुटुंबियांच्या कौटुंबिक संबंधांना देखील ठाकरेंनी उजाळा दिला.

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह नगरच्या दौऱ्यावर आले. दुपारी त्यांचे शिर्डीत आगमन झाले. त्यानंतर त्यांनी सोनई येथे जाऊन गडाख यांची भेट घेतली. घरीच आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी गडाख यांना शुभेच्छा दिल्या. एकत्र जेवण केलं.

शरद पवारांचं ते स्वप्न पूर्ण होणार, ठाकरेंना भक्कम साथ देणाऱ्या नेत्याने सर्वांसमोर स्पष्टच सांगितलं
त्यानंतर शनिशिंगणापूर येथे जाऊन शनीला अभिषेक केला. दर्शन घेतले. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि स्थानिक प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. शनिशिंगणापूरला दर्शनासाठी आलेल्या अनेक परप्रांतीय भाविकांनीही ठाकरे यांच्याशी हस्तांदोलन केले.

गडाख यांच्या भेटीसंबंधी बोलताना ठाकरे म्हणाले, खरे तर दीड वर्षापूर्वीच मला गडाख यांच्या भेटीसाठी यायचे होते. संकटाच्या काळात लढणारा व खंबीरपणे मागे उभा राहणारा सैनिक आमदार शंकारराव गडाख यांच्या रूपाने मला मिळाला आहे. जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. गडाख यांच्या भेटीमुळे नवी ऊर्जा व लढण्यास बळ मिळाले आहे. ही ऊर्जा घेऊन मी माझा संघर्ष सुरूच ठेवणार आहे.

ठाकरेंना कोर्टाच्या निकालाचा अर्थ कळला, आता जनतेत जायचं, पाठीराख्याच्या वाढदिवसाला नगरमध्ये!
गडाख यांचे नगर जिल्ह्यासह, राज्याच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. त्यांचे काम दिपस्तंभाप्रमाणे आहे. कुटुंब उभे करण्याचे काम गडाख यांनी केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव गडाख यांच्या हस्ते झाल्याचे सांगून ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे व यशवंतराव गडाख यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed