धाराशिव : परंडा तालुक्यामधील इयत्ता ८ मध्ये शिक्षण घेणाऱ्या १३ वर्षीय मुलीचे आई, वडिल हे शेतात कामाला गेले होते. सदरील मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधून शेजारील २६ वर्षीय तरुणाने जबरदस्तीने १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. मुलीने विरोध करताच तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी पीडित मुलीची मोठी बहीण शाळेत गेली होती. पीडित मुलगी घरासमोरील अंगणात काम करत असताना २६ वर्षीय तरुणाने पीडित मुलीच्या हाताला धरुन घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. कोणाला सांगितलेस तर तुझ्या आई,वडिलांना जिवंत मारेन, अशी त्याने धमकी दिली आणि तेथून पोबारा केला.पीडित मुलगी कपडे धुण्यासाठी गावाजवळील नदीवर गेली असता गावातील दुसऱ्या तरुणाने नदी जवळील वेडया बाभळीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घडलेला प्रसंग कोणाला सांगितल्यास तुझ्या आई, वडिलांना जीवे मारीन अशी धमकी देत तो तरुण तेथून पसार झाला.
ही घटना ४ महिन्यांपूर्वी घडली आहे. ४ दिवसांपूर्वी पीडित मुलगी कुटुंबासह कोल्हापूर येथे चुलत्याच्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमास गेली होती. त्यावेळी मुलीच्या पोटात दुखू लागले. मुलीला डॉक्टरकडे उपचारासाठी दाखल केले असता ही मुलगी ३ महिन्याची गर्भवती निघाली. आई-वडिलांनी विचारले असता पीडित मुलीने ४ महिन्यांपूर्वी २ तरुणांनी केलेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली.

आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली
मुलीच्या तोंडून हे ऐकताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन कोल्हापुर येथे 0 (झिरो) गुन्हा दाखल झाला. नंतर परंडा पोलीस स्टेशनला गुन्हा वर्ग झाला. यातील पहिल्या २६ वर्षीय आरोपीला परंडा पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा आरोपी फरार आहे.
या आरोपी विरुध्द भारतीय दंड संहिता कलम- ३७६(३), ३७६ (२) (एन), ३५४ अ (१) (आय), ३५४ (डी), ५०६, ३४ सह पोस्को क ४, ६, ८, १२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी प्रथम तपास पोलीस उपनिरीक्षक के.डी.जगताप यांनी केला असून हा तपास आज पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर डंबळ भूम यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.