• Mon. Nov 25th, 2024
    Pune News : पुण्यात मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यामुळे धावत्या पीएमपी बसचे छतच उडाले

    पुणे : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून वेगाने वारे वाहत आहेत. अशात भरधाव वाऱ्यामुळे घराचे छत उडाल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील. पण, पुण्यात चक्क पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) धावत्या ई-बसचे वाऱ्यामुळे छत उडाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास वारजे माळवाडी पुलावर घडली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर पीएमपी प्रशासनाने ठेकेदाराला नोटीस बजावली असून सर्व ई-बसची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. निगडी डेपोची ई-बस निगडी ते कात्रज दरम्यान सोमवारी धावत होती. सायंकाळी सातच्या सुमारास ही बस वारजे माळवाडी पुलावर होती. त्यावेळी आचानक जोराचा वारा आणि पाऊस सुरू झाला. यामध्ये काही प्रवासी देखील होते.

    मुंबई एअरपोर्टवरून चप्पला बदलापूरला जाणार होत्या, पोलिसांनी तपासताच चक्रावले; हाती लागलं १ कोटींचं घबाड
    अचानक जोराचा आवाज झाला आणि ई-बसच्या छत आचानक उडून बाजूला पडले. नट तुटल्यामुळे बसचे छत उडाल्याचे आढळून आले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी प्रवासी खूपच घाबरले होते. वाहक व चालकांनी प्रवाशांना खाली उतरून दुसऱ्या बसने पाठविण्यात आले. ती बस दुरूस्तीसाठी डेपोमध्ये पाठविण्यात आली. या घटनेची माहिती अपघात विभाला देखील देण्यात आली नाही. छत दुसऱ्या वाहनावर अथवा फिरून बसमधील प्रवाशांच्या अंगावरच पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.

    Mumbai Crime: आई शेजाऱ्यांकडे गेली, भावासमोरच बहिणीला खोलीत खेचलं अन्…; २२ वर्षीय तरुणाचं क्रूर कृत्य

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed