• Sat. Sep 21st, 2024
तर समाज मला जगू देणार नाही, नागपुरात महाविद्यालयीन तरुणीचं चिठ्ठी लिहून टोकाचं पाऊल

म.टा. प्रतिनतधी नागपूर : ‘मी समलिंगी आहे. समाज मला जगू देणार नाही, लग्न केल्यास मी पतीलाही सुख देऊ शकणार नाही’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गिट्टीखदान पोलिस स्टेशन हद्दीत घडली. सोनू (बदललेले नाव), असे मृतकाचे नाव आहे. ती बीए द्वितीय वर्षाला शिकायची.

प्राप्त माहितीनुसार, सोनूचे वडील शासकीय सेवत कार्यरत आहेत. आई गृहिणी असून तिचा लहान भाऊ शिक्षण घेत आहे. सोनू ही समलिंगी होती. याबाबत तिने कुटुंबीयांनाही माहिती दिली. कुटुंबीयांनी तिची समजूतही घातली होती. गेल्या काही दिवसांपासून ती तणावात राहायला लागली. रविवारी दुपारी तिचे वडील, आई व भाऊ कामानिमित्त बाहेर गेले. सोनूने खोलीतील पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. दुपारी तिचे वडील व भाऊ घरी परतले. त्यांना सोनू ही गळफास लावलेली दिसली. फास काढून दोघांनी सोनूला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. पोलिसांनी सोनूने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. ‘मी समलिंगी आहे. याला समाजात विरोध आहे. समाज मला मान्यता देणार नाही. लग्न झाल्यानंतर मी व माझा पती दोघेही सुखी राहू शकणार नाहीत. आयुष्य संपविण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’, असे सोनूने चिठ्ठीत लिहिले आहे. सोनूच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नितीन विटोले यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Pune Cash Seized : नाकाबंदीत कारची डिकी उघडली, बॅगेत नोटांच्या गड्ड्या, हडपसरमध्ये ३ कोटी ४२ लाखांची रोकड जप्त

दोन महिन्यातील दुसरी घटना

समलैंगिक संबंधातून आत्महत्येची उपराजधानीतील गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी हुडकेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या २३ वर्षीय जिया या तरुणीने आत्महत्या केली होती. ती आयटीआयमध्ये शिकत होती. ६ मार्चला जियाने मैत्रिणीसमोरच विष प्राशन केले. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणात सोनेगाव पोलिसांनी पिंकी व श्वेताविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून दोघींना अटक केली होती.

‘मला आता सवय झाली आहे…’, शेवटच्या चेंडूवर सामना जिंकल्यानंतर रिंकू सिंग काय म्हणाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed