मुंबई: मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते ६३ वर्षांचे होते. विश्वनाथ महाडेश्वर यांना मंगळवारी पहाटे दोन वाजता हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.आज दुपारी दोन वाजता पार्थिव राजे संभाजी विद्यालय, सांताक्रूझ(पूर्व) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता विश्वनाथ महाडेश्वर यांची अंत्ययात्रा निघेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुपारी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अकाली निधनाने ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे.
विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आहेत. त्यांनी मुंबईचे महापौरपद भूषवले आहे. त्यांनी नागरिक शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. विश्वनाथ महाडेश्वर २००२ मध्ये सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले. मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या काळात विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती करण्यात आली.विश्वनाथ महाडेश्वर यांची राजकीय कारकीर्द
विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आहेत. त्यांनी मुंबईचे महापौरपद भूषवले आहे. त्यांनी नागरिक शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. विश्वनाथ महाडेश्वर २००२ मध्ये सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले. मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या काळात विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती करण्यात आली.
विश्वनाथ महाडेश्वर यांची राजकीय कारकीर्द
2002 बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून निवड
2003 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून निवड
2007 बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले
2012 बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले
2017 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड…
महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेते किरीट सोमय्या मारहाण प्रकरणी महाडेश्वर यांना अटक झाली होती
अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीच्या वेळी विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
ऋतुजा लटके यांचा पालिकेतून राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी महाडेश्वरांनी विशेष प्रयत्न केले होते.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नसताना अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी विश्वनाथ महाडेश्वर यांच देखील नाव चर्चेत होते.