रत्नागिरी : समाज माध्यमांवर प्रभाव असणारी कोकणची हार्टगर्ल अंकिता प्रभू वालावलकर हिने सुंदर कोकणातला निसर्ग दाखवून त्याचे आजवर अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केले आहेत. अंकिता प्रभू वालावलकर हिचे लाखो फॅन्स आहेत. पण राजापूर बारसू रिफायनरीचे तिने समर्थन केल्यामुळे समाज माध्यमांवर अंकिता वालावलकर हिला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सुंदर कोकण दाखवून युट्युबवर लाखो रुपये कमावले आणि आता कोकणी माणसाची बाजू घेण्याची वेळ आल्यावर रिफायनरीला समर्थन देतेस… अशा संतप्त भावना व्यक्त करत नेटकरी अंकिताला ट्रोल करतायेत.अंकिता प्रभू वालावलकर हिने रिफायनरीची बाजू घेतल्याने ताईने सुंदर कोकण दाखवून, मालवणी भाषा बोलून, यूट्युब वरती बक्कळ पैसे कमावले आणि आता ताई कोकणात रिफायनरीला समर्थन देते.. असं कसं चालेल ताई? अशा भावना कोकणातील तरुण तरुणींच्या आहेत. त्यांनी याच भावना व्यक्त करताना अंकिताला लक्ष्य केलंय. एका व्यक्तीने अंकिताला लक्ष्य केलेला बॅनर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याने त्याची चर्चा होतीये.
‘केरला स्टोरी’ स्पॉन्सर करणाऱ्या नेत्यांवर केदार शिंदे भडकले, ट्विट करुन खरपूस समचार
दुसऱ्यांच्या मतांचा आदर कधी करायला शिकणार?
कोकण हार्टेड गर्ल या ग्रुपवर अंकिता प्रभूने आपण दुसऱ्यांच्या मतांचा आदर करायला कधी शिकणार आहोत? असा सवाल उपस्थित करणारी पोस्ट लिहून खालच्या पातळीवरची टीका करणाऱ्यांचा तिने चांगलाच समाचारही घेतला आहे.धार्मिक कार्यक्रमात घुसायच्या, महिलांवर नजर ठेवायच्या अन् संधी मिळताच… पोलिसांकडून १० महिलांना बेड्या
अंकिता प्रभू कोण आहे?
अंकिता प्रभू वालावलकर ही समाज माध्यमांवर लोकप्रिय आहे. ती प्रसिद्ध युट्यूबर असून तिचे मालवणी भाषेतले व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरलेले आहेत. आपल्या व्हिडीओजमधून कोकण आणि कोकणातील संस्कृती ती दाखविण्याचा प्रयत्न करते. झी मराठीवरच्या चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमातही तिने नुकतीच हजेरी लावली होती. तिला आजवर अनेक पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. महाशक्ती सन्मान २०२२ हा पुरस्कार देऊन तिचा नुकताच गौरव झाला.
कोकणातल्या संस्कृतीचे व्हिडिओ शेअर करून तिने आपला मोठा चाहता वर्गही तयार केला आहे. कोकणातील नैसर्गिक विविधता दाखवणारे अनेक व्हिडिओज तिचे सोशल मीडिया वरती ट्रेंड आहेत. तिचे लाखो चाहते आहेत.