• Sat. Sep 21st, 2024

तिला भेटायला बोलावलं, तुझं दुसऱ्याशी लफडं आहे, असं म्हणत ओळखीच्या महिलेला बेदम मारहाण

तिला भेटायला बोलावलं, तुझं दुसऱ्याशी लफडं आहे, असं म्हणत ओळखीच्या महिलेला बेदम मारहाण

छत्रपती संभाजीनगर: तीन वर्षापासून ओळख असलेल्या महिलेला भेटायला बोलवत, ‘तुझं दुसऱ्याशी लफड आहेच, असं म्हणत एका ओळखीच्या व्यक्तीने महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पाच मे रोजी गुरुवारी कीले अर्क भागामध्ये घडली आहे. या प्रकरणी गुन्हा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश नाना रगडे (राहणार हर्सूल परिसर) असे आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलाही हर्सूल परिसरामध्ये राहते. महिला कुटुंबीयांसोबत राहत असताना तिची ओळख रितेश याच्याशी होती. दरम्यान गुरुवारी रितेश याने महिलेला फोन करून भेटायला बोलावलं. पीडित महिलेचा रितेश हा ओळखीचा असल्यामुळे महिला त्याला भेटायला गेली. यावेळी रितेश याने काहीही न ऐकता महिलेला तुझं दुसऱ्या सोबत लफड आहे असं म्हणत वाद घालायला सुरुवात केली.

बागेश्वर बाबा पोलिसांच्या रडारवर, अंबरनाथमधील कार्यक्रमापूर्वी बजावली नोटीस, दिला इशारा
महिलेला केली बेदम मारहाण

याप्रकरणी महिला रितेशला समजून सांगायचा प्रयत्न करत होती. मात्र रितेश काहीच ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हता. यावेळी त्याने तुझं दुसऱ्या सोबत लफड आहे असा आरोप केला. यावेळी माझं असं काही नसून तू माझ्या फक्त ओळखीचा आहेस, तू असं कसं बोलू शकतो,असं ती महिला समजून सांगत असताना आरोपी रितेश आणि महिलेला बेदम मारहाण केली.

शेतकरी सकाळी शेतावर गेला तो घरी परतलाच नाही, कुटुंबीयांनी शेतावर जाऊन पाहिले ते धक्कादायक होते
या संपूर्ण घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने ही बाब आपल्या कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीयांनी महिलेला घेऊन पोलीस ठाणे गाठले. यावेळी घडलेली घटना महिलेने पोलिसांना सांगितले दरम्यान याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रितेश रगडे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दिवटे हे करीत आहेत.
उबर गाडीने मावशीसोबत फिरायला आला, धरणाच्या पाण्यात खेळण्यासाठी उतरला, डोळ्यासमोर घडले धक्कादायक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed