• Sat. Sep 21st, 2024

ऐकावं ते नवलंच! बकरीला बोकडाचे लिंग शिवून तो विकत होता मटण; असा झाला भांडाफोड

ऐकावं ते नवलंच! बकरीला बोकडाचे लिंग शिवून तो विकत होता मटण; असा झाला भांडाफोड

धुळे : धुळे शहरातील वाडीभोकर रोडवरील ‘पप्पू’ नामक मटण विक्रेता अनेक दिवसांपासून ग्राहकांना चांगलाच फसवत होता. बोकडाचे मटण भासवून तो चक्क बकरीचे मांस विकत असल्याचा धंदा तो करीत होता. मात्र, ग्राहक म्हणून गेलेल्या ॲड. नितेश बोरसे यांनी त्याच्या या बेईमानीचा भांडाफोड केला. दुकानात हुकाला लटविलेल्या मटणाबाबत शंका आल्याने ॲड. नितेश बोरसे यांनी तपासून पाहिले असता बकरीला बोकडाचे लिंग पांढऱ्या दोऱ्याने शिवलेली आढळून आली.यावेळी ॲड. नितेश बोरसे यांनी लागलीच त्यांचे मित्र तथा नगरसेविका पती अरुण पवार यांना घडलेला प्रसंग फोनद्वारे सांगितला. त्यानंतर अरुण पवार यांनी घटनास्थळी येवून मटण विक्रेत्याला जाब विचारला. यावेळी परिसरातील नागरीकांची मोठी गर्दी जमल्याने काही काळ याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. जमावापुढे मटनवाला पप्पूनेही आपली बेईमानी मान्य केली. शिवाय यापूर्वीही होळीला तसेच दर रविवारी बकरीचे मटण विकत असल्याचे त्याने कबूल केले. दाट वस्तीत असा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण धुळे शहरातील इतर भागात विकत असलेल्या मटणाबाबत शंका निर्माण होऊ लागल्या.

बारामती : तू मला आवडतेस म्हणत तरुणीचा विनयभंग; पुढे केले लज्जा उत्पन्न करणारे कृत्य, पळवून नेण्याचाही प्रयत्न
शहरातील वाडीभोकर रोडवर पप्पू मटण शॉप नामक दुकान आहे. या दुकानात मटण घेण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या अक्षरश: रांगा लागतात. शिवाय परिसरातील सर्व ग्राहक हे उच्चशिक्षित आहेत. काल सायंकाळी अभियंता नगरातील रहिवासी ॲड. नितेश बोरसे हे नेहमीप्रमाणे या दुकानावर मटण घेण्यासाठी आले. मात्र, त्यांना मटणाबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी हुकला लटकविलेल्या मटणाची तपासणी केली असता त्यांना बकरीला बोकडची निशाणी पांढऱ्या दोऱ्याने शिवलेली दिसून आली. त्यामुळे त्यांना धक्काच बसला आणि हा सर्व प्रकार नागरिकांना समजला.

एअर इंडियाच्या विमानात बसताच महिला प्रवाशाला विंचू चावला, मुंबईत पोहोचताच रुग्णालयात दाखल
ॲड. नितेश बोरसे यांनी मटण विक्रेत्याला जाब विचारला. तेव्हा दुकानातील कर्मचाऱ्यानेही आपली चुक कबूल केली. तोपर्यंत दुकानमालक पप्पू हा देखील तेथे दाखल झाला. त्यालाही याबाबत जाब विचारण्यात आला. तसेच हा प्रकार किती दिवसांपासून करतोय ? असा प्रश्न विचारला असता तेव्हा त्याने धुलिवंदनाच्या दिवशीही बकऱ्या कापल्याचे मान्य केले.

सत्तासंघर्ष: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे सरकार राहील की गडगडेल?, पवारांनी स्पष्ट सांगून टाकले
तसेच दर रविवारी जास्त गर्दी असल्याने ३ ते ४ बकऱ्या कापतो असे त्याने मान्य केले. विशेष म्हणजे यापूर्वीही या दुकानमालकास अशी बेईमानी करताना पकडले होते. तेव्हा त्याने माफी मागीतली होती. परंतु, नंतरही त्याने आपले धंदे सुरुच ठेवल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed