वाशिम : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे व त्यांची पत्नी – प्रख्यात सिने अभिनेत्री क्रांती रेडकर यांची वाशिम जिल्ह्यातील सामाजिक कार्यक्रमांना वाढती उपस्थित आता चर्चेचा विषय बनला आहे. वानखेडे दाम्पत्याच्या मनात नेमकं काय सुरू असेल याचा अंदाज जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोक घेण्याचा प्रयत्न करत आहेत.ड्रग्ज प्रकरणात अनेक सेलिब्रिटींवर कारवाई करणारे समीर वानखेडे हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वरुड गावाचे रहिवासी आहेत. त्यांच्यावर माजी मंत्री नवाब मलिक यांनी अनुसूचित जातीचा खोटा दाखला घेऊन नोकरी मिळवल्याचा आरोप केल्यानंतर वानखेडे यांनी वाशिम न्यायालयात व जात पडताळणी समितीकडे धाव घेतली होती. आपण घेतलेला अनुसूचित जातीचा दाखला योग्य असल्याचे त्यांनी सिद्ध केले होते. तेव्हापासून त्यांच्या आपल्या मूळगावी व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चकरा वाढल्या आहेत. अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन त्यांच्या मार्फत केले जात आहे.
Vishwas Nangre Patil : नंबर पाठव अर्जंट आहे, विश्वास नांगरे पाटलांच्या नावे बनावट फेसबुक खाते
आता वानखेडेंच्या प्रमुख उपस्थितीत रिसोड तालुक्यातील सवड येथे सोमवारी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, पौर्णिमा कांबळे यांचा भीम गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच मागील महिन्यात शहीद झालेले पॅरा कमांडो दिवंगत अमोल गोरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या सोनखास या गावी ८ मे रोजी तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात समीर वानखेडे मुख्य मार्गदर्शक आहेत तर आर्यन खान प्रकरणात पंच म्हणून नाव असलेले वादग्रस्त फ्लेचर पटेल हे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च वानखेडे यांनीच केला असल्याची पक्की माहिती आहे.बाबासाहेबांमुळे आपण सर्व, राष्ट्र सर्वोपरी हाच माझा सिद्धांत – समीर वानखेडे
समीर वानखेडे व क्रांती रेडकर यांची जिल्ह्यातून निवडणूक लढविण्याची तर तयारी नाही ना, या दृष्टीने आता राजकीय नेते व कार्यकर्ते विचार करत आहेत. शिवाय वानखेडे यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सिद्ध झाल्याने ते अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या वाशिम विधानसभा मतदार संघावर डोळा ठेऊन असल्याचेही बोलले जात आहे. परंतु आमच्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नसून केवळ सामाजिक सेवा करू, असे वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे.
Raj Thackeray : राजीनामा दिल्यास आपल्यालाही ‘ए गप बस रे’ म्हणतील, पवारांना भीती; राज ठाकरेंकडून अजितदादांची नक्कल