रत्नागिरी : गेली तीन चार वर्षे काय चालले आहे कळत नाही, मला असं वाटतं की शरद पवार यांना खरंच राजीनामा द्यायचा होता, पण त्यानंतर अजित पवारांचं ‘ए तू गप्प बस… ए तू शांत रहा…’ हे रुप पाहून शरद पवारांना वाटलं असेल, की उद्या हा मलाच ‘ए तू गप्प बस… ए तू शांत रहा…’ म्हणेल, म्हणून त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. रत्नागिरीत आयोजित सभेत राज ठाकरे यांनी चौफेर टीका केली. शरद पवारांनी भाषणात कधी शिवछत्रपतींचं नाव घेतलं नाही, आणि उलट मीच शिवरायांच्या स्मारकाला विरोध करत असल्याचा आरोप केला गेला, असंही राज म्हणाले.कोकणातल्या मुंबई गोवा महामार्गाच्या २००७ पासून रखडलेल्या कामावरही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. मी मागच्या वेळी कोकणात आलो तेव्हा मी रस्त्याची स्थिती पाहून देवेंद्र फडणवीस यांना फोन केला, तेव्हा ते मला म्हणाले नितीनजींना फोन लावला तर बरं होईल, तेव्हा मला गडकरींनी सांगितले की ठेकेदार पळून गेले. कोकणातल्या माणसाला गृहीत धरले जाते, फक्त मतांसाठी वापर केला जातो, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
प्रकल्प बारसूला की नाणारला होणार, तुमच्या पायाखालून हजारो एकर जमीन निघून जाते, तेव्हा कळत नाही का? बारसू हे नाव आले कोठून? मला वाटले नाणारचे नाव बदलले की काय, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. मुंबईतून येता, संध्याकाळी भेटता, गप्पा मारता, तेव्हा कळत नाही का तुमच्या पायाखाली असलेली जमीन गेलेली आहे, राजकिय नेत्यांचे दलाल या जमिनी विकतात हे तुम्हाला कळत नाही का? असा खडा सवाल राज यांनी उपस्थित केला.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प येण्याआधी तसेच झाले, आताही तसेच होतेय, व्यापारी जमिनी विकत घेतात आणि नंतर तुम्हाला कळते की प्रकल्प येतोय. कोकणात जे आहे ते केरळ गोवा येथे आहे, त्यावर अख्खे राज्य चालू आहे, हे प्रकल्प कधी केरळ गोव्यात जात नाहीत, पण आम्ही कधी कोकणाकडे लक्ष दिले नाही, आमचा संबंध फक्त गणपती आणि शिमगा इतकाच. कोकण ही प्रतिभावंतांची भूमी आहे, सहा भारतरत्न इथले आहेत चार भारतरत्न एकट्या दापोलीतील आहेत, असंही राज यांनी सांगितलं.