डोंबिवली : दारू पिऊन शिव्या दिल्याने संतापलेल्या तरुणाने बहिणीच्या नवऱ्यावर चक्क चाकूने वार करत त्याची हत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.डोंबिवली खंबाळपाडा परिसरात गुरूवारी दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून दारू पिऊन शिव्या दिल्या. या मुळे संतापलेल्या तरुणाने बहिणीच्या नवऱ्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात त्याच्या बहिणीचा नवरा मरण पावला. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात आरोपी रमेश तेवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून मारीकणी तेवर असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंबाळपाडा परिसरात मारीकणी तेवर हे आपल्या कुटुंबासह राहतात. इडली विक्रीचा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मारीकणी यांना दारूचे व्यसन होते. गुरूवारी दुपारच्या सुमारास मारिकनी हे दारू पिऊन घरी आले. त्यांनी सासरच्या लोकांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी मेव्हणा रमेश तेवर याने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मारीकणी काही ऐकत नव्हता. त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला.

मारीकणी यांच्यावर चाकूने सपासप वार
हा वाद इतका विकोपाला गेला की, रमेशने मारीकणी याच्यावर चाकूने सपासप वार केला. या हल्ल्यात मारीकणी याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात रमेश तेवर विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.