चिमूर तालुक्यातील पांढरवानी गावातील शालू शामराव घरत हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परीषद शाळेत झाले. तिने यानंतरचे शालेय शिक्षण नेरी येथील सरस्वती कन्या विद्यालय येथे घेतले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आंनद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे पूर्ण करून विज्ञानातील पदवी (बीएस्सी ) चे शिक्षण नवरगाव येथील ज्ञानेश महाविद्यालयातुन पूर्ण केले .सध्या तिचे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान विषयातील
पदव्युत्तर अभ्यासक्रमाचं शिक्षण सुरु आहे.
मोहफुलांपासून केक अन् गुलाबजामपर्यंत अनेक पदार्थ; आदिवासी महिलांच्या रोजगारासाठी तरुणीची भन्नाट कल्पना
विज्ञान विषयातील पदवी मिळवल्या नंतर अधिकारी बनण्याच्या उद्देशाने नेचर फाउंडेशनतर्फे सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा वर्गामध्ये स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण तिने घेतले.यादरम्यान तिच्या संघर्षाची आणी जिद्दीची दखल ब्राईटएज फाऊंडेशननं घेतली. ब्राईटएज फाऊंडेशनच्या मॅजिक परिवारामार्फत देण्यात येणाऱ्या सहारा शिष्यवृत्तीसाठी शालूची निवड करण्यात आली.या शिष्यवृत्तीमधून दरमहा आर्थिक मदत तिला मिळत होती. ज्यामुळे तिला पुणे सारख्या शहरात विज्ञानातील पदव्युत्तर शिक्षणासह स्पर्धा परीक्षेची तयारी करता आली.तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे.
शालूने मिळविलेल्या यशाचे कौतुक होत आहे.ती गावात येताच गावकऱ्यांनी तिचे जोरदार स्वागत केले. जीवनात काहीतरी करून यशस्वी व्हायचे होते. नेचर फाऊंडेशननं माझ्यामध्ये अधिकारी होण्याच्या स्वप्नाचे बीज रोवले आणि त्या स्वप्नाला भक्कम आर्थिक पाठबळ ब्राईटएज फाऊंडेशन आणि मॅजिक परिवाराच्या सहारा स्कॉलरशिपने दिले. यामुळेच पुणे सारख्या ठिकाणी मला शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करता आली. अभ्यासात सातत्य आणि नियोजन असले तर यश नक्की मिळते, असं शालू घरत म्हणाली.