• Mon. Nov 25th, 2024
    पोटाची खळगी भरण्यासाठी छ. संभाजीनगरात, तिसऱ्या मजल्यावरच्या घटनेनं तिघांचं आयुष्य बदललं

    छत्रपती संभाजीनगर : इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ४३ वर्षीय बांधकाम मजुराचा तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि.२ मे रोजी रात्री आठ वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उस्मानपुरा येथील ज्योती नगर येथे उघडकीस आली. महिन्याभरात बांधकाम मजुराच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिसऱ्या मजल्यावर घडलेल्या घटनेमुळे त्याच्या पश्चात उरलेल्या पत्नी आणि दोन लेकरं अशा तिघांचं आयुष्य कायमचंच बदलून गेलं आहेया प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू हरिदास बिश्वास (वय ४३ वर्ष, रा. खलबोलीया जि. नदिया, पश्चिम बंगाल, हल्ली मुक्काम उस्मानपुरा) असे मयत झालेल्या मजुराच नाव आहे. त्याचा बारा वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्याची पत्नी पश्चिम बंगालमधील गावी राहते.

    वावटळीत झोळी ४०० फूट उंच उडाली, दगडावर आदळली; झोपेतच चिमुरडीचा अखेरचा श्वास
    राजू हा गेल्या काही दिवसांपासून बांधकाम मजुरीचे काम करतो. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उस्मानपुरा भागात एका इमारतीचे बांधकाम सुरू असल्यामुळे तो दोन महिन्यांपूर्वी रोजगारासाठी शहरामध्ये आला होता. नियमित काम सुरू होतं. मंगळवार दि. २ मे रोजी सात वाजताच्या सुमारास माणूसमारे यांचे उस्मानपुरा येथे काम चालू आहे. बांधकाम साइटवर तिसऱ्या मजल्यावरून काम करीत असताना तो अचानक खाली पडला.

    मित्रांनी रंग लावू नये, म्हणून गच्चीवर लपला; खाली पडून तरूणाचा मृत्यू

    दरम्यान ही बाब त्याच्या सहकाऱ्यांच्या लक्षात येताच त्याला तात्काळ घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास म. पो. हे. मंदा सामसे करीत आहे.

    पती जायचा न् त्याचा मित्र यायचा, एके रात्री नवऱ्याने रंगेहाथ पकडलं, मुंबईत भीषण हत्याकांड
    काही दिवसांपूर्वी उस्मानपुरा भागातील एका मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. त्यानंतर ही दुसरी घटना आहे. शहरात बांधकाम व रंगकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात मात्र अनेक वेळा या कामगारांकडून सुरक्षेसाठी वापरण्यात येणारी हेल्मेट व इतर साहित्य वापरण्यास टाळाटाळ होते. अश्या ठिकाणी काम करणारे कामगार व कंत्राटदारांनी कामगारांना सुरक्षेची साहित्य द्यावी तसेच कामगारांनी देखील त्याचा वापर करावा जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed