• Mon. Nov 11th, 2024
    डुलकी लागली आणि घात झाला, आंब्याने भरलेला पिकअपची ट्रकला धडक; पत्नीला गमावलं

    रायगड : कोकणातून आंबा घेऊन येणाऱ्या पिकअप ट्रकने गॅस सिलेंडर भरलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पिकअपमधील महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी झाला आहे.

    मुंबई – गोवा महामार्गवरील पेण तालुका हद्दीमध्ये हमारापूर फाट्याजवळ बुधवारी पहाटे पाच वाजता गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक आणि पिकअप ट्रकमध्ये धडक होऊन, अपघात झाला. कोकणातील देवगड येथून मुंबईकडे आंबा घेऊन जाणाऱ्या महिंद्रा पिकअपने गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

    Nashik News: दुर्दैवी! मित्रांसह ब्रह्मगिरी पर्वत चढला, उतरताना ५० किलोच्या दगडाने मोठा आवाज केला अन्…
    हा अपघात पहाटेच्या वेळी घडला. चालकाला झोप लागली असल्याने हा अपघाता झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र अपघातामध्ये सुमित चंद्रकांत खवळे (२८) रा. देवगड, सिंधुदुर्ग हा गंभीर जखमी झाला असून, त्याची पत्नी स्पृहा सुमित खवळे (२४) हिचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात स्थळी दोन्ही वाहनं एकमेकांमध्ये अडकली असल्याने, वाहतूक पूर्णतः बंद झाली होती.

    हा अपघात इतका भीषण होता, की ट्रक पूर्णपणे रस्त्त्याच्या कडेला जाऊन पडला. पिकअप ट्रकमधील पती-पत्नी कोकणातील देवगडमधून मुंबईकडे निघाले होते. त्यावेळी वाटेतच त्यांच्यावर काळाने घात केला. पहाटेच्या सुमारास झोप लागल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात पती जखमी झाला असून त्याच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
    ्र
    Railway News : मुंबईहून पुणे, नाशिकला जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! घाटात नो ब्रेक, रेल्वेगाड्यांचा वाढणार वेग
    दुसऱ्या अपघातामध्ये कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस पलटी झाली. बस पलटी झाल्याने या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले आहेत. पेण हद्दीमधील डोलवी येथे जेएसडब्लू कंपनीची बस कामगारांना घेऊन जात असताना, टायर फुटल्याने बस पलटी झाली.

    १५ वर्षानंतर शिक्षकाला पहिला पगार मिळाला, घरी पोहोचतानाच काळाने गाठलं, मुलासह प्रवास थांबला

    या अपघातामध्ये बसमधून प्रवास करणाऱ्या अठरा कामगारंपैकी आठ जणांना गंभीर स्वरूपाची दुःखापत झाली आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सकाळच्या वेळेस झालेल्या या अपघातामुळे मुंबई-गोवा मार्गवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed