एकनाथ शिंदे हुतात्मा स्मारकाला मानवंदना करायला गेले होते. ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्यामुळं तुम्ही मुख्यमंत्री बनला. ज्या भांडवली प्रवृत्तीला मुंबई महाराष्ट्राला मिळू नये असं काही जणांना वाटत होतं. आपल्याला मुंबई कशी मिळाली हे सांगितलं पाहिजे. त्यावेळी संपूर्ण गिरणगाव पेटलं होतं, लक्ष्मी कॉटेजवर अश्रूधुराचा मारा करण्यात आला होता. गिरणी कामगार, कामगारांनी लढा दिला. त्यावेळी महिलांनी रस्त्यावरुन पोलिसांना गोळ्या घालण्याचं आव्हान दिलं. महिलांमध्ये जी जिद्द होती ती घ्या, असा सल्ला एकनाथ शिंदेंना ठाकरे यांनी दिलं.
वज्रमुठीचा हिसका तुम्ही पाहिला असेल. कसब्याची निवडणूक, मार्केट कमिटीची निवडणूक असेल, विधान परिषदेची निवडणूक असेल किंवा अंधेरीची निवडणूक असेल मविआच्या वज्रमुठीच्या ताकदीनं विजय मिळाला आहे. बारसू महाराष्ट्रातील भाग आहे. तिथं बोलणार आहे. बारसूमध्ये ६ मे रोजी सकाळी जाणार नंतर महाडला सभा घेणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
वज्रमूठ भारतमातेचं संरक्षण, संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आहेच. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. जो आपल्या देशासाठी मरायला तयार होतो तो आपला आहे .मध्यप्रदेशच्या निवडणुका झाल्यातर भाजपचा पराभव होईल, मध्य प्रदेशच्या एका पत्रकारानं सांगितलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
चीन देशाचा भूगोल बदलत आहे, राज्यकर्ते देशाचा इतिहास बदलत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या शिवसैनिकाच्या घरी ईडी सीबीआयवाले पोहोचत आहेत. ईडीवाले चीनला पाठवून बघा परत येतात का, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
२०१४ साली अच्छे दिन येणार म्हणून सांगितलं होत आले का अच्छे दिन, हजारो किंवा कोट्यवधी नोकऱ्या देणार होते मिळाल्या का नोकऱ्या, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना मराठी भाषा सक्तीची केली होती. गद्दारी करुन सरकार पाडलं आणि तो निर्णय मागं घेतला, कुठे आहेत बाळासाहेबांचे विचार, असा सवाल उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना केला.मुंबईतील बीकेसीची सोन्यासारखी जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली. मुंबईतून अहमदाबादला किती लोक जणार आहेत. अहमदाबादवरुन किती लोक मुंबईत येणार आहेत? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
मविआच्या वज्रमुठीचा एकच ठोसा लावू, महापालिकेच्या निवडणुका लावा, जिल्हा परिषदेच्या लावा, लोकसभेच्या लावा किंवा तीन निवडणुका एकत्र लावा, मविआच्या वज्रमुठीचा ठोसा लावू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. जमीन काय असते ते अमित शाहांना दाखवू, असं चॅलेंज उद्धव ठाकरेंनी दिलं.