• Sat. Sep 21st, 2024
राजकारण्यांना स्वाभिमानी कोल्हापूरकराची चपराक, मतदानासाठी दिलेले पैसे मतपेटीत टाकत सुनावलं

कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. यामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळालं असलं तरी चर्चा मात्र एका भलत्याच गोष्टीची सुरू आहे.मतपत्रिकेसोबत मतपेटीत पाचशे रुपयांच्या काही नोटा मिळाल्या आहेत. उमेदवाराकडून मतासाठी देण्यात आलेले हजार रुपये एका प्रामाणिक मतदाराने पाकिटात घालून मतपेटीत टाकून दिले आहेत. पैसे कोणी दिले याचा उल्लेख न करता त्यांनी ते निवडणूक आयोगाला पैसे परत पाठवून देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मतांसाठी पैशांच गाजर दाखवणाऱ्या राज्यकर्त्यांना चपराक बसली आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आज मतमोजणी सुरू होती सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली यावेळी मतं पेट्या उघडण्यात आल्या आणि मतांची विभागणी होऊ लागली यावेळी एका मतपेटीत खाकी कलरच पाकीट सापडलं आणि सर्वांचे लक्ष या पाकिटाकडे केंद्रीत झालं या पाकीटामध्ये काय आहे याची उत्सुकता सर्वांनाच होऊ लागली. पाकीट कोणी टाकलं आणि कोठे टाकलं याची माहिती कोणालाच नव्हती. पाकीट उघडले असता यामधून पाच पाचशेच्या दोन नोटा मिळाल्या. मतपेटीत एका स्वाभिमानी मतदाराने मतासाठी मिळालेले हजार रुपये मतपेटीत टाकले होते. तसेच हे पैसे निवडणूक आयोगाने जमा करून घ्यावेत असे यावर संदेश दिला होता.

मुंबई इंडियन्सला सामना सुरु होण्यापूर्वीच मिळाली गुड न्यूज, मॅचविनर खेळाडूची संघात एंट्री

यामुळे याची चर्चा सध्या कोल्हापुरात सुरू आहे. तसेच मतदार सभासदांनी राज्यकर्त्यांना चांगलेच कानपिचक्या देत चिठ्ठ्यांमध्ये अगदी गुवाहाटी ते ईडी कारवायांपर्यत सगळ्याचा उल्लेख करत विकासाकडे लक्ष द्या म्हणत अनेक सल्ले ही दिले आहेत तर चंद्रकांत पाटील यांना पक्ष वाढवण्याचाही सल्ला काही सभासद मतदारांनी चिठ्ठ्यांद्वारे दिला आहे.

ठाकरेंची सभा झाली, वैशालीताईंनी ताकद दाखवली, पहिल्याच निवडणुकीत कडवी लढत, किशोर पाटील पाचोऱ्यात काठावर पास

कोल्हापूर कृषी बाजार समितीवर मविआची सत्ता

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पॅनलनं १८ पैकी १६ जागा मिळवत विजय मिळवला. माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील यांच्या पॅनलची सत्ता आली. काही दिवसांपूर्वी झालेल्या छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निववडणुकीत मतदारांनी चिठ्ठ्यांद्वारे नेत्यांना सल्ला दिला होता.
मुंबई इंडियन्सचा मोठा धक्का, रोहितच्या वाढदिवशी अर्जुन तेंडुलकरसह अजून एका खेळाडूला डच्चू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed