• Mon. Nov 25th, 2024

    मुंबई गोवा महामार्गावर लक्झरी बसला अपघात, चालकाचं नियंत्रण सुटलं, डिव्हायडरला धडकून बस उलटली

    मुंबई गोवा महामार्गावर लक्झरी बसला अपघात, चालकाचं नियंत्रण सुटलं, डिव्हायडरला धडकून बस उलटली

    महाड, रायगड : मुंबई गोवा महार्गावर रायगड जिल्ह्यात महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील चांडवे टोल नाक्याजवळ रविवारी पहाटे पावणे तीनच्या वाजता खासगी बसला अपघात झाला. ड्राइवरचे नियंत्रण सुटून लक्झरी बस डिव्हायडरवर धडकली आणि टायर फुटून उलटल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये २२ पैकी ७ प्रवासी जखमी झाले आहेत. यात कुठलीही जीविहानी न झालेली नाही. यामुळे मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जात आहे.अपघातावेळी लक्झरी बसमध्ये एकूण बावीस प्रवाशी होते. अपघात झाल्याची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मारुती आंधळे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या प्रवाशांपैकी ७ प्रवासी जखमी झाले होते. जखमी प्रवाशांना तात्काळ महाड येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर त्यापैकी तिघांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरीत ४ जणांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. अन्य प्रवाशांना दुसरी बस बोलावून त्यामध्ये बसवून त्यांचा घरी सुखरुप पाठविण्यात आले आहे. सबंधित लक्झरी ड्राइवर विरुद्ध महाड एमयडीसी पोलीस ठाण्यात भा. द. वी. कलम २७९, ३३७, ३३८, सहकलम १८४ मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

    शिवशाही बसला भीषण अपघात: चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटली, १ जागीच ठार, २२ प्रवासी जखमी
    अपघातात जखमी प्रवाशांची माहिती मिळाली आहे. यामध्ये मुंबई येथील तीन जणांचा समावेश आहे.

    गणपती दामोदर एडवी (वय ५६, रा. कुवारबाव जागुस्टे कॉलनी, ता. जि. रत्नागिरी), सुजाता शशिकांत मोरे (वय ६९, रा. उत्कर्षनगर सार्थक सोसायटी, टेंभीपाडा रोड रत्नागिरी), ईशा मुरलीधर साळवी (वय १९, रा. कोळबे रत्नागिरी), बाळकृष्ण पांडुरंग बने (वय ७९, रा. ओमसाईप्रसाद अशोक केदारी नाका, भांडुप, मुंबई), उर्मीला उमेश जाधव (वय ४८, रा. भगीरथी निवास, बागवे कंपाउंड भांडुप, मुंबई), रिहाना अब्दुल रहेमान शेख (वय ५०, रा. जनता कॉलनी, अंधेरी), पूजा दिनेश मयेकर (वय २६, रा. भाटीमिऱ्या रत्नागिरी), शशांक विजय सोमेश्वरकर (वय ३०, रा. कोतवडे रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत.
    लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आटोपून परतत होते, कुटुंबासह कार २० फूट दरीत कोसळली
    दरम्यान, अपघातप्रकरणी लक्झरी चालक शशांक विजय सोमेश्वरकर (वय ३०, रा. कोतवडे ता. जि. रत्नागिरी) याच्यावर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed