• Mon. Nov 25th, 2024

    विदर्भात वादळीवाऱ्यासह पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यात २ मेपर्यंत पावसाचा अंदाज, पिकांची काळजी घ्या

    विदर्भात वादळीवाऱ्यासह पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यात २ मेपर्यंत पावसाचा अंदाज, पिकांची काळजी घ्या

    अकोला: मागील काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. आता काल सलग चौथ्या दिवशी शुक्रवारी (२८ एप्रिल) जिल्ह्यातील पातूर, बाळापूर, बार्शीटाकळी तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यात कांद्याचे पीक मातीमोल झाले असून त्यातच आता पुन्हा प्रादेशिक हवामान विभागाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.प्रादेशिक हवामान विभाग नागपुर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार अकोला जिल्ह्यात मंगळवार (२ मे) पर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. यादरम्यान ताशी ४०-५० किमी याप्रमाणे वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, बाजार समितीतही विक्रीसाठी आणलेला माल सुरक्षित ठेवावा, मालाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. विजा व गारांपासून बचाव करावा, सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार एस.पी.ढवळे यांनी केले आहे.

    फेसबुकवर मैत्री, महिलेने भेटायला हॉटेलमध्ये बोलवले, शिक्षकाला रुममध्ये नेलं, अन् घडलं भलतंच
    हवामान विषयक व विजेबाबत अद्यावत माहितीकरिता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थान प्राधिकरणाव्दारे निर्मित ‘गुगल प्ले स्टोअर’वरील दामिनी अँप डाऊनलोड करुन त्याचा वापर करावा. वादळी वारा विजा चमकत असताना घरातील खिडक्या व दरवाजा बंद ठेवावे. घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवाराऱ्याच्या ठिकाणी व मजबूत इमारतीमध्ये आश्रय घ्यावा. घराबाहेर असल्यास ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर राहावे.

    चिमाजी आप्पांनी जिंकलेला ठाण्यातील ऐतिहासिक किल्ला नामशेष, पुरातत्व विभागाची धक्कादायक कबुली
    उघड्या जागेत असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसुन हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्याच्या मध्ये झाकावे. मोकळ्या तसेच लटकत्या तारापासून दुर राहावे. वारा वादळाच्या स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. वज्राघात बाधित व्यक्तीस त्वरीत वैद्यकीय मदत मिळवुन द्यावी. हृदयाजवळील भागाच्या परीसराला मॉलिश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने निर्गमित केल्या आहेत.

    पत्नी घर सोडून गेली, नवऱ्याचं डोकं सटकले, पोटच्या दोन मुलांसोबत केलं अमानुष कृत्य, एकाचा मृत्यू

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *