• Sat. Sep 21st, 2024

शेळ्या चारायला गेली, अचानक गारांसह जोरदार पाऊस , आडोसा घ्यायला झाडाकडे धावली अन् घात झाला

शेळ्या चारायला गेली, अचानक गारांसह जोरदार पाऊस , आडोसा घ्यायला झाडाकडे धावली अन् घात झाला

लातूर: शिक्षिका होऊन ऊसतोड कामगार असलेल्या आई वडिलांना आधार द्यायचा आहे. समाजासमोर आदर्श ठेवायचा, ही स्वप्न पाहात कुटुंबला हातभार लावत शिक्षण घेणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा शेळ्या चरायला गेली असताना वीज कोसळून मृत्य झाला आहे. त्यासोबतच तिच्या स्वप्नांची राखरांगोळी झाल्याची घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात घडली.लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी मोठ्या गारा पडल्याने शेतपिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीज कोसळून जिवीतहानी झाली. जिल्ह्यात एकूण ११ जनावरे वीज कोसळून दगावली आहेत. तर एका अल्पवयीन मुलीचाही वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे.

सोन्यासारखं पीक घेतलं, लाखोंचं उत्पन्न येणार म्हणून सख्खे भाऊ शेतात राबत होते, तेवढ्यात नियतीने कट रचला
निलंगा या तालुक्याच्या ठिकाणापासून चार किलोमीटर असणाऱ्या मुबारकपूर तांड्यावर आरुषी नथुराम राठोड ही ११ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. अवघी दीड एकर कोरडवाहू शेती, घरी खाणारी सहा तोंडं, त्यामुळे आरूषीचे आई-वडील अन् मोठा भाऊ ऊस तोडीच्या कामावर जायचे. आरूषीही घरातील छोटी मोठी काम करून कुटुंबाला आई वडिलांना मदत करायची. तिला दोन लहान बहिणी आहेत.

आई-वडील, मोठा भाऊ ऊस तोड तसेच अन्य ठिकाणी कामावर गेल्यास ती आई होऊन लहान बहिणीचा सांभाळ करायची. एकूणच मुबारकपूर तांड्यावर असणारी लमाण समजातील परिस्थिती पाहून तिनं शिकून शिक्षिका होण्याचं ठरवलं होतं. याबद्दल ती सर्वांना सांगत असे, मी मोठी होऊन शिक्षिका होणार आहे. मला आई वडिलांसह काबाडकष्ट करणाऱ्या भावाची मदत करायची आहे आणि जे मुलं गरीब घरातील आहे अशा मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करायचे आहे.

अमरावतीत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; कुंड नदीला महापूर, गावांचा संपर्क तुटला

या ध्यासाने ती सतत अभ्यास आणि कुटुंबाला कामात मदत करणारी आरुषी काल दुपारी शेळ्या चारण्यासाठी शेतात गेली होती. मात्र, दुपारी आभाळ भरून आले आणि पावसाचे वातावरण निर्माण झाले, वादळी वाऱ्यासह पावसाळा सुरूवात झाली. विजांचा कडकडाट आणि गारांसह पाऊस कोसळू लागल्याने आरुषी असरा घेण्यासाठी झाडाकडे धावली. मात्र, तिच्यावर वीज कोसळली त्यातच तिचा मृत्यू झाला. ही घटना समजताच तांड्यावर शोककाळा पसरली.

बदला! दोन वर्षांपासून वाट बघत होता, तो परदेशातून परतला अन् खेळ खल्लास, कारण ठरला एक कबुतर…
तिच्यावर मुबारकपूर तांड्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. तिच्या अशा अकाली जाण्याने तिची सप्न आणि आठवणी शिल्लक राहिल्यात. तिच्या आठवणीने व्याकुळ होऊन हंबरडा फोडणाऱ्या तिच्या आईचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed