नांदेडःघराच्या बांधकामासाठी बँकेतून पैसे आणण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर काळाने घाला घातला. वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे भिंत अंगावर कोसळ्याने एकाचा मृत्यू आणि इतर तीन जण जखमी झाले. नांदेड कुष्नुर मार्गावरील कहाळा जवळील एका ढाब्यावर गुरुवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. व्यंकटी लक्ष्मण दंडलवाड असं मयत झालेल्या व्यक्तीच नाव आहे.मयत व्यंकटी लक्ष्मण दंडलवाड हे नायगाव तालुक्यातील कहाळा खुर्द येथील रहिवासी आहे. गुरुवारी दुपारी बँकेतून पैसे काढण्यासाठी ते दुचाकीवर कुष्णुर येथे गेले होते. परत गावाकडे येत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्याने दंडलवाड हे काहाळा परिसरातील एका धाब्यावर थांबले. त्यांच्यासह इतर तीन वाहनचालक देखील धाब्याचा आडोसा घेत थांबले होते. वादळी वाऱ्याचा प्रचंड वेग आणि अवकाळी पावसामुळे धाब्यावरील पत्रे उडून गेले. तसेच भिंतीचा काही भाग देखील कोसळला होता. भिंतीचा आडोसा घेतलेल्या व्यंकटीसह इतर तीन जणाच्या अंगावर देखील ही भिंत कोसळली.
भिंत अंगावर पडल्याने व्यंकटी दंडलवाड यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जण खाली दबले गेले. घटनेनंतर नागरिकांनी मदतकार्य करत सर्वांना बाहेर काढले आणि जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले. जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान या घटनेने नायगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. व्यंकटी दंडलवाड यांच्या दुर्देवी मृत्यूने हळहळ व्यक्त होतं आहे.

घराचं स्वप्न अपूर्ण
मयत व्यंकट लक्ष्मण दंडलवाड हे आपल्या कुटुंबियांसह हैदराबाद येथे कामा निमित्त राहत होते. घरकुल मंजूर झाल्याने सर्व कुटुंबीय महिन्याभरापूर्वी गावाकडे आले होते. घराच्या बांधकामची तयारी देखील त्यांनी सुरु केली होते. गंवडीला पैसे द्यायचे असल्याने ते बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. मात्र त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने दंडलवाड कुटुंबियांवर दुःखाच डोंगर कोसळला आहे. लक्ष्मण दंडलवाड यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
नांदेडचा नॅशनल हायवे वाहतुकीसाठी बंद; पुणे- मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय