• Sat. Sep 21st, 2024
अपघातानं डोक्यावर परिणाम, तरुणाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; आई धावली, रुग्णालयात नेलं, पण…

छत्रपती संभाजीनगर : २३ वर्षीय शेतकरी पुत्राने शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना १८ एप्रिल रोजी घडली होती. दरम्यान, उपचार सुरू असताना काल बुधवारी दुपारी तीन वाजता शेतकरी पुत्राचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल सोमीनाथ चित्रक (वय २३, रा.सुलतान वाडी ता. फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल हा फुलंब्री तालुक्यातील सुलतानवाडी येथे कुटुंबीयांसोबत राहतो. आई वडिलांकडे कोरडवाहू शेती आहे. यावर उदरनिर्वाह होत नसल्याने ते मजूरीही करतात.

बारसू प्रकरणावरून संजय राऊतांनी शरद पवारांना विचारलं, … म्हणजे नेमकं करायचं काय?
राहुलचे बारावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. दरम्यान, एक महिन्यापूर्वी राहुलचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये राहुलच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जखमी झाला होता. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. अपघातामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता. दरम्यान, १८ एप्रिल रोजी सकाळी उठल्यानंतर राहुल हा शौचासाठी जातो म्हणून घरातून निघाला. थोडा वेळ झाला राहुल घरी न आल्यामुळे त्याची आई त्याला बघण्यासाठी गेली.

यावेळी राहुल हा गळफास घेत असल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आलं आणि आई धावत त्याच्याकडे गेली. आरडाओरड करत कुटुंबातील सदस्यही त्याच्याकडे धावत गेले. त्याला तात्काळ खाली उतरून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना काल त्याचा दुपारी तीन वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे गणेश काळे करत आहेत.

WTC फायनलसाठी भारतीय संघात मोठा बदल; BCCIने पाच खेळाडूंची नव्याने केली निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed