• Sat. Sep 21st, 2024
बेडला कप्पे, गुप्त जागेतील गाडीत घबाड, नाशकात आयकरचे बिल्डरवर छापे, ३३३३ कोटीचे व्यवहार

नाशिक :नाशिक शहरात आयकर विभागाने चार बड्या बांधकाम व्यवसायिकांवर छापेमारी केली. २० ते २५ एप्रिल या पाच दिवसांच्या काळात हे धाडसत्र सुरु होतं. यात तब्बल ३ हजार ३३३ कोटी रुपयांचे बेहिशेबी मालमत्तांचे व्यवहार उघडकीस आल्याचा दावा केला जात आहे. तर साडेपाच कोटी रुपयांची रोकड आणि दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागाची ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई मानली जाते. जालन्यात लग्नाचं वऱ्हाड असल्याचं भासवत वाजत-गाजत जाऊन छापेमारी करणाऱ्या आयकर विभागाच्या पथकातील काही जणांचा यातही समावेश असल्याची माहिती आहेनाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह मुंबई, ठाणे पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर कार्यालयातील सुमारे २२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचं पथक नाशिकमध्ये दिवस-रात्र तळ ठोकून होतं. जवळपास १०० खासगी वाहनातून हे पथक नाशिकमध्ये पहाटे-पहाटेच दाखल झालं होतं.

संबंधित बिल्डर प्रामुख्याने नाशिक आणि परिसरातील जमीन व्यवहार आणि बांधकाम व्यवसाय करतात. त्यांच्या बेहिशेबी उत्पन्नाशी संबंधित कागदपत्रे विविध गुप्त ठिकाणांवरून जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये बेडमधील लपवलेले कम्पार्टमेंट, गुप्त जागी पार्क केलेल्या गाड्यांमधून फिल्मी स्टाईलने ही कागदपत्रं हस्तगत करण्यात आली.

विविध गुन्ह्यांशी संबंधित कागदपत्रे, पेन ड्राईव्ह, हार्ड ड्राइव्ह, अनेक हस्तलिखित डायरी आदी जप्त करण्यात आल्या आहेत. तपास पथकाने बांधकाम व्यावसायिकांच्या जवळपासच्या इमारतींमधील सीसीटीव्ही फुटेज, महत्त्वाच्या व्यक्तींच्या सीडीआर डेटाचे विश्लेषण, चालकांच्या मोबाईल फोनचे लाईव्ह लोकेशन आणि आरटीओकडून डेटा मिळवत विश्लेषण केले आणि ही गुप्त ठिकाणं शोधून काढली.

वादळी वाऱ्यामुळे कंटेनरचा आडोसा घेतला, तोच पलटला; जळगावात दोन मजुरांचा दबून मृत्यू…
सापडलेल्या एकूण बेहिशेबी रोख व्यवहारांची रक्कम तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. प्राप्तिकर विभागाला महाराष्ट्रात आजपर्यंत सापडलेल्या बेहिशेबी मालमत्तेपैकी ही मोठी रक्कम आहे.

जालन्यात स्टील कारखानदारांवर छापा; सापडलेली रोकड मोजण्यासाठी 13 तास लागले

या डेटाच्या आधारे कर बुडवणार्‍यांवर आयकर विभाग पुढील कारवाई करू शकतो. या छाप्याने नाशिकसह महाराष्ट्रातील करचुकवेगिरी करणाऱ्या बड्या व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.

आमचा सोन्या पळाला; हिसका देत पुण्यात बैलाचं पलायन, मालक थेट पोलिसात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed