काय आहे प्रकार
छत्रपती संभाजीनगर शहरात बेगमपुरा भागामध्ये असलेल्या विद्युत कॉलनीत राहणारा अशोक गुरप्पा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी करतो. नोकरी करत असताना काही दिवसांपूर्वी त्याने वाळुज एमआयडीसी भागामध्ये स्वतःचा मसाल्याचा उद्योग सुरू केला होता. या दोन्ही ठिकाणाहून येणाऱ्या उत्पन्नातून अशोक बंडगर याने विद्यापीठाला लागून असलेल्या विद्युत कॉलनी बेगमपुरा येथे घर घेतलं. त्यानंतर एक आलिशान गाडी देखील घेतली. मात्र लग्नानंतर प्राध्यापकाला दोन्ही मुलीच झाल्या. यामुळे प्राध्यापक व त्याची पत्नी नाराज होती. गडगंज संपत्तीला वारस असावा अशी खंत या दोघांच्याही मनात होती. मात्र नोकरीमुळे तिसरे अपत्य होऊ देता आले नाही. परंतु मुलगा नसल्याची खंत प्राध्यापक व त्याच्या पत्नीच्या मनात होती.
या प्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत्तीला वारसा नसल्याची मनातील खंत काढण्यासाठी प्राध्यापक व त्याच्या पत्नीने एक कट रचला. यामध्ये विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या एका ३० वर्षीय विद्यार्थिनीचा विश्वास संपादित केला. तिच्या घरातील परिस्थितीचा अंदाज घेतला. नंतर त्या विद्यार्थिनीला हॉस्टेलमध्ये न राहू देता आपल्या घरी राहण्यास प्रवृत्त केलं. विद्यार्थिनीला फसवून शारीरिक संबंध प्रस्थापित करत, मुलगा झाल्यानंतर तिला सोडून देण्याचा दोघा पती पत्नीचा प्लॅन होता, अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील महत्वाच्या बातम्या थेट व्हॉट्सॲपवर!
महाराष्ट्र टाइम्सच्या कम्युनिटीला जॉईन करण्यासाठी सोबतच्या लिंकवरक्लिककरा.
https://chat.whatsapp.com/GfoWEgjFQnR0EPIne258kF
सतत दोन वर्ष हा प्रकार सुरू असल्यामुळे विद्यार्थिनी त्रस्त होती. ती आजारी असल्यामुळे तिचे वडील तिला घेण्यासाठी आले, तशी ती घरी गेली. मात्र घरी गेल्यानंतरही प्राध्यापकाने तिचा पिच्छा सोडला नाही. तिला येण्यासाठी वारंवार तगादा लावला. घाबरलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्येचाही विचार केला, मात्र तिच्या मैत्रिणींनी तिला धीर दिला. दरम्यान हा संपूर्ण घटनाक्रम तिने विद्यापीठाच्या कुलगुरुंना सांगितला. कुलगुरुंनी या प्रकरणात लक्ष घालत मुलीला धीर दिला. तिला विशाखा समितीकडे समुपदेशन करण्यासाठी सांगितलं. विद्यापीठाने प्राध्यापकाला नोटीस पाठवल्यानंतर त्याने थेट विद्यार्थिनीचं गाव गाठलं आणि तिथे गोंधळ घातला. त्या ठिकाणी गावकऱ्यांनी प्राध्यापकाला चांगलाच हिसका दाखवला. गावामध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर प्राध्यापक व पत्नी विरुद्ध विद्यार्थिनीने बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला.
नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी नाट्यशास्त्र विभागामध्ये पश्चिम बंगाल येथून एक विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी आली होती. या मुलीसोबत देखील प्राध्यापक अशोक बंडगर यांनी असंच कृत्य केलं होतं. दरम्यान हा घडलेला प्रकार विद्यार्थिनीने कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्यासमोर कथन केला. कुलगुरूंनी या प्रकरणी तक्रार देण्यासाठी मुलीची समजूत काढली मात्र मुलीच्या आई-वडिलांनी या प्रकरणी तक्रार देण्यास नकार दिल्यामुळे तक्रार देता आली नाही. आई-वडिलांनी त्या मुलीचे शिक्षण बंद करून तिला गावाकडे घेऊन गेले अशी देखील माहिती दिली.