दरम्यान, काही दिवसांनी पुढे काय करावं याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी गेली असता प्रा. बंडगर याने नाट्यशास्त्र विभागात जागा आहे, तुझा प्रवेश होऊन जाईल असे सांगून एमपीएसाठी आवश्यक असलेली कागदपत्रं नसतांना प्रा. बंडगरने प्रवेश करून दिला. काही दिवसांनी पीडित ही शिकवणी व परीक्षेसाठी विद्यापीठात आली असता तिने हॉस्टेल साठी अर्ज केला. मात्र त्यादरम्यान हॉस्टेल बंद होते. यावेळी नाट्यशास्त्र विभागात पीडितेला प्रा. बडगर भेटून मुलींसाठी हॉस्टेल चांगले नसते असे सांगून विद्युत कॉलनी येथील घरी घेऊन गेला. त्यांना दोन मुली आहेत. या मुलींसोबत पीडिता बहिणीप्रमाणे राहू लागली.
दरम्यान पीडिता हॉल मध्ये झोपलेली असताना रात्री तीन वाजता प्रा. बंडगर हा तिथे आला व पीडितेला अतिप्रसंग केला. वारंवार अतिप्रसंग होत असल्याने पीडितेला संपूर्ण प्रकार त्याच्या पत्नी पल्लवीला सांगितला. यावेळी पल्लवी म्हणाली तू जे काही सांगत आहे ते मला मान्य आहे. तू हे घर सोडून जाऊ नको. तुझ्यामुळे माझा संसार उध्वस्त झाला आहे. तू आता माझ्या पतीसोबत लग्न कर. आम्हाला दोन मुलीच आहे. तुझ्यापासून आम्हाला मुलगा पाहिजे. तू जर असे केलं नाही तर मी माझ्या जीवाचं बर वाईट करून घेईल अशी धमकी पीडितेला त्याला दिली.
त्यानंतर प्राध्यापकाची पत्नी पीडितेला पतीसोबत झोपण्यासाठी पाठवत असे. यादरम्यान पीडिता ही बेशुद्ध पडली. खाजगी दवाखान्यात उपचार केले. त्यानंतर पीडितेला पेपर असल्याने तिला फक्त सही करून पेपर न देता प्राध्यापक घेरी घेऊन आला. त्यानंतर पीडितेवर अत्याचार केला. दरम्यान पीडितेची तब्येत बिघडली असल्याने तिचे वडील तिला घेण्यासाठी आले. यावेळी पती-पत्नीने मुलीचे पेपर सुरू असल्याने घेऊन जाण्यास विरोधक केला. मात्र आजारी असल्याने पीडिता वडिलांसोबत घरी गेली.
पीडिता घरी असताना पती-पत्नीने संभाजीनगर येथे येण्यासाठी वारंवार फोन करायला सुरुवात केली. दरम्यान प्राध्यापकाच्या फोन धमक्या वाढल्याने पीडितेला वडिलांनी याबाबत विचारले असता तिने घडलेली हकीकत सांगितली. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महिला तक्रार समितीकडे तक्रार केली. या प्रकरणी विद्यापीठाने पती-पत्नीला नोटीस दिल्याने दोघांनी पीडितेला धमकी दिल्या. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात प्राध्यापक पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
