• Mon. Nov 25th, 2024

    ३८ प्रवाशांना घेऊन जाणारी शिवशाही कर्नाळा खिंडीत पलटी, एकाचा दुर्दैवी मृत्यू, २५ प्रवासी जखमी

    ३८ प्रवाशांना घेऊन जाणारी शिवशाही कर्नाळा खिंडीत पलटी, एकाचा दुर्दैवी मृत्यू, २५ प्रवासी जखमी

    नवी मुंबई:मुंबई-गोवा महामार्गवरील पनवेल जवळील कर्नाळा खिंडीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर २५ प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पनवेलहून महाडच्या दिशेने एक शिवशाही बस (एमएच ०९ इएम ९२८२) ही निघाली होती. दरम्यान, कर्नाळा खिंडीतील तलावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाली. या बसमधून ३८ प्रवासी आणि चालक आणि वाहक असे एकूण ४० जण प्रवास करत होते. या अपघातात एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २५ प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये दिप्तेश मोरेश्‍वर टेमघर (वय ३२ रा.पडम, ता.रोहा) याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    १५ वर्षानंतर शिक्षकाला पहिला पगार मिळाला, घरी पोहोचतानाच काळाने गाठलं, मुलासह प्रवास थांबला

    तर पनवेल उपजिल्हा रुग्णालयामध्ये आठ जखमी रुग्ण उपचार घेत आहेत. पेण हॉस्पिटलमध्ये चार जखमी रुग्ण उपचार घेत आहेत. तर कामोठे एमजीएम रुग्णालयात तेरा जखमी रुग्ण उपचार घेत आहेत. तर बस चालक हर्षल तायडे आणि कंडक्टर राजेश मेहता हे सुखरुप बचावले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होत तातडीने त्यांनी मदत कार्य सुरु केले. यावेळी अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेमधून पनवेल उपजिल्हा रुग्णालय तसेच कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    ब्रिटनमधील जगन्नाथ मंदिरासाठी तब्बल २५० कोटी, अंबानी-अदानी नाही तर कोण आहे ती व्यक्ती?
    मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच एमजीएम कामोठे येथे पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांनी भेट घेऊन जखमींची विचारपूस केली तसेच तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांची भेट घेवून आवश्यक असलेल्या औषधोपचाराची माहिती घेतली आहे.

    २००० वर्ष जुना खजिना सापडला, जमिनीत पुरलेला होता, पाहून पुरातत्त्वशास्त्रज्ञ भलतेच खूश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed