पुणे :पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये जागेवरून वाद होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सिंहगड एक्स्प्रेसमध्ये सोमवारी पुन्हा एकदा जागेच्या कारणावरून सात जणांनी मिळून एका प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये एक प्रवासी जखमी झाला असून याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदीप सिद्राम गोंरगावे (वय ३७, रा. वराळे, ता. मावळ) असे मारहाणीत जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संदीप हे सोमवारी सकाळी पुणे मुंबई सिंहगड एक्स्प्रेसने प्रवास करत होते. लोणावळा स्टेशनवरून ते सिंहगड एक्स्प्रेसमध्ये चढले. पासधारकांच्या बोगीत एका ठिकाणी जागा दिसल्याने त्यांनी रिकाम्या जागेवर बसण्याचा प्रयत्न केला.
यावेळी तिथे असलेल्या सात प्रवाशांनी संदीप यांच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर मारामारीत झाले. यात संदीप यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.
यावेळी तिथे असलेल्या सात प्रवाशांनी संदीप यांच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर मारामारीत झाले. यात संदीप यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.
पुणे-मुंबई दररोज सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्स्प्रेस धावतात. दररोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी या तीनही रेल्वे सोयिस्कर आहेत. या एक्स्प्रेसमध्ये पास धारकांसाठी आरक्षित डब्बे आहे. या डब्ब्यांमध्ये जुन्या पासधारकांकडून नवीन पासधारकांना धमकाविण्याचे आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. या महिन्यातील मारहाणीची ही पाचवी घटना असून रेल्वे प्रवास सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.