बुटीबोरी नगरपरिषदेचे माजी सभापती बबलू गौतम यांनी लावलेल्या या पोस्टरमध्ये फडणवीस यांची मुख्यमंत्री अशी वर्णी लागली आहे. हे पोस्टर शहरातील प्रमुख चौकात लावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह सर्व बड्या नेत्यांची छायाचित्रे छापण्यात आली आहेत.
शहरात चर्चा सुरू झाली
अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा आहे. मात्र, या वृत्तांना पूर्णविराम देत त्यांनी राष्ट्रवादीतच राहण्याची चर्चा केली. मात्र, भुजबळांच्या वक्तव्यानंतर हे पोस्टर समोर आल्याने जिल्ह्यात नवी चर्चा सुरू झाली आहे. या पोस्टरबाबत बबलू गौतम यांच्याशी संवाद साधला असता, देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. ते राज्याचे मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस हेच भावी मुख्यमंत्री राहतील. त्यामुळे आम्ही बुटीबोरी चौकात असा फलक लावला आहे. राज्याच्या राजकारणात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू असतानाच नागपुरातील होर्डिंग्ज चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळेच आगामी काळात मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा असताना राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
अजित पवारांच्या सासुरवाडीत भावी मुख्यमंत्री नावाने बॅनर लागले
सकाळ समूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे वक्तव्य केले होते. अजित पवारांनी इच्छा व्यक्त करताच त्यांच्या सासुरवाडीत भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स झळकले आहेत. उस्मानाबाद जिल्हयातील तेर ही अजित पवार यांची सासुरवाडी आहे. याच तेरमधील चौकात मोठ मोठे बॅनर झळकले आहेत. तसेच अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी संत गोरोबा काकाची पूजा-आरती करण्यात आली. अजित दादा आमचे नेते आहेत. ते जर मुख्यमंत्री झाले तर सासुरवाडीचा विकास करतील. गेल्या अनेक वर्षांपासून तेर गावचा विकास झाला नाही. जावई मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच आहे. अजित दादा आमचे नेते आहेत. ते जर मुख्यमंत्री झाले तर सासरवाडीचा विकास करतील, अशी भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.
अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचंय,माझ्या शुभेच्छा; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले