• Sat. Sep 21st, 2024
कुणाचा कंडका पडला? महादेवराव महाडिक यांचा विजयानंतर गुलाल उधळत सवाल,सतेज पाटलांना डिवचलं

कोल्हापूर :संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी मतमोजणी सुरु आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात असणाऱ्या रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासून महाडिक गटाच्या उमेदवारांनी मतमोजणीत आघाडी घेतली आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानं राज्याचं लक्ष निकालाकडे लागलं होतं. सुरुवातीच्या मतमोजणीत महाडिक गटानं विजयाचा गुलाल उधळला आहे. महादेवराव महाडिक राजाराम कारखाना संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा विजय झाला.

राजाराम साखर कारखान्यासाठी ९१.१२% मतदान चुरशीने आणि अटीतटीने मतदान झालं होतं. त्यामुळे आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांना थांबण्याच्या जागा वेगवेगळ्या ठिकाणी निश्चित करण्यात आल्या आहेत.

महादेवराव महाडिक यांचा विजय

कोल्हापूर राजाराम कारखाना निवडणूक निकालात महाडिक गटानं आघाडी घेतली आहे. राजाराम कारखाना संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा विजय झाला आहे. महादेवराव महाडिक यांना ८३ मते मिळाली तर विरोधी उमेदवार सचिन पाटील यांना ४४ मतं मिळाली आहेत.

WTC फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा, IPLमधील धमाक्याने अजिंक्यने मिळवली कसोटी संघात जागा

विजयानंतर बोलताना महादेवराव महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे. कारखान्याच्या निवडणुकीत कंडका कुणाचा पडला हे दाखवा,असं महाडिक म्हणाले. सगळे कंडके पडले त्या लाकडात आता काय राहिलं नाही.

महाडिक गटाचा जल्लोष

कोल्हापूरच्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल हाती आला असून यामध्ये संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजय झाले आहेत. महादेवराव महाडिक यांना ८३ मते पडले आहेत तर सदस्य पाटील गटातील विरोधी उमेदवार सचिन पाटील यांना अवघे ४४ पडली. महादेवराव महाडिक यांचा विजय होताच राजाराम साखर कारखाना परिसरात महाडिक समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे.

दिवसा मतदान, रात्री काय तो तमाशा, त्या पाटील बाईला बोलवा, अजितदादांची मिश्किल टिप्पणी

महाडिक गटाचे उमेदवार आघाडीवर

सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीत महाडिक गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. या आघाडीचं रुपांतर विजयात होताना दिसत आहे. महादेवराव महाडिक यांनी विजय मिळवला आहे.

Rajaram Sakhar Karkhana Result LIVE : छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीची मतमोजणी, वाचा LIVE अपडेट्स…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed