या अपघातानंतर अग्निशमन दलाकडून तत्परतेने बचाव कार्य करत प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं. यामध्ये एका चिमुकलीला वाचवण्यासाठी जावानांनी मोठी कसरत करावी लागली, त्यामुळे त्या चिमुकलीला जीवदान देखील मिळाले. मात्र, या भीषण अपघात त्या सहा वर्षीय चिमुकलीने आपली माय गमावली. चिमुकलीला सुखरुप वाचवल्यामुळे या जवानांचं कौतुक करण्यात आलं. अधिरा प्रमोद भास्कर असं या चिमुकलीचं नाव आहे. तर निशा प्रमोद भास्कर (वय ३६) असं तिच्या आईचं नाव आहे. निशा या अधिराला घेऊन मुंबई-कल्याण येथे असलेल्या आपल्या माहेरी जात होत्या.
हा भीषण अपघात पुण्यातील जांभूळवाडी दरी पुलाजवळील स्वामी नारायण मंदिराजवळ आज रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमाराला घडला. हा अपघात अत्यंत भीषण होता. या अपघातात बसच्या पुढच्या बाजूला एका बया चिमुकल्या अधिराचे हात-पाय आणि केस अडकले होते. मोठी मेहनत घेत अग्निशमन दलाच्या जवानांना या चिमुकलीला वाचवण्यात यश आलं.
जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान संतोष भिलारे, संजय सपकाळ आणि अन्य त्यांचे सहकारी यांना माहिती मिळाली होती की, बसच्या पुढच्या बाजूला एक महिला आणि एक सहा वर्षांची मुलगी अडकलेली होती. जवानांनी तिला अतिशय जिकरीचे प्रयत्न करत जखमी अवस्थेत बाहेर काढले. अग्निशमन जलाच्या जवानांनी एकूण १८ जखमींना बाहेर काढले असून एक महिला आणि एक सहा वर्षीय मुलगी अडकली होती. महिलेला सुखरूप बाहेर काढलं असलं तरी लहान चिमुकलीला काढणं अवघड होतं.
चिमुकलीचे केस आणि हात-पाय बसमधल्या एका सीटाखाली अडकले होते. मुलीचे हात-पाय मोकळे करण्यासाठी कटवणीच्या साह्याने सीट कापण्यात आली. त्यानंतर मुलीचे केस कापले आणि मुलीला दोरी बांधून बस मधून बाहेर काढलं. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवलं. दरम्यान, जवानांच्या या कार्याचं आता सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.