परभणी :परभणी शहरातील इकबालनगर भागात असलेल्या जिकरिया हॉस्पिटल येथे प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू झाल्याच्या समजल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालय परिसरामध्ये गोंधळ घालत रुग्णालयावर दगडफेक केली. नातेवाईक रुग्णालयात गोंधळ घालत असल्यामुळे शनिवारी रात्रीपर्यंत रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टाळला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने रुग्णालय परिसरात साजरी लावली यामुळे रुग्णालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.परभणी शहरातील वांगी रोड परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिलेला प्रसूतीसाठी परभणी शहरातील इकबाल नगर येथील डॉक्टर सालिया जिकरिया यांच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. महिलेची प्रसूती शनिवारी झाल्यानंतर दुपारच्या सुमारास महिलेचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. प्रसूतीसाठी दाखल केलेल्या महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती नातेवाईकांना मिळतात नातेवाईकांनी रुग्णालय परिसरामध्ये गर्दी केली आणि त्यानंतर गोंधळ घालायला सुरुवात केली.
डॉक्टर आणि या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी करत रुग्णालयावर दगडफेक केली. या घटनेची माहिती पोलिसांना समजतात पोलिसाचा मोठा फौज फाटा रुग्णालय परिसरात दाखल झाला. त्यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाईकांनी पोलिसांशी देखील गोंधळ घातला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांचा गोंधळ रुग्णालय परिसरात सुरूच होता. पोलिसाचा मोठा फौजफाटा असल्यामुळे रुग्णालय आणि परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लागले लक्ष
दरम्यान, या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिलेच्या शवविच्छेदनाचा अहवाल काय येतो यावरून पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी नातेवाईकांना दिले. त्यानंतर तणावाचे वातावरण निवळण्यास मदत झाली. महिलेच्या शवविच्छेदनाचा अहवाल का येतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.