• Sat. Sep 21st, 2024

नवी मुंबईत पुन्हा छमछम, डान्सबारमध्ये पहाटेपर्यंत चालतात अश्लील नृत्ये; पोलिसांची मोठी कारवाई

नवी मुंबईत पुन्हा छमछम, डान्सबारमध्ये पहाटेपर्यंत चालतात अश्लील नृत्ये; पोलिसांची मोठी कारवाई

नवी मुंबई :नवी मुंबई शहरामध्ये डान्स बार हा अनेक विभागांमध्ये अवैधरित्या वेळेचं भान न बाळगता चालवला जातो, अनेक वेळा पोलिसांनी कारवाया करून देखील डान्सबारवाल्यांची छमछम काही केल्या बंद होत नाही. रात्र रात्र चालू असणाऱ्या ह्या डान्सबारचा नवी मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. नवी मुंबई मधील कोपर खैरणेतील मेट्रो या डान्सबारवर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकून कारवाई केली. शहरात काही ठिकाणी डान्सबार चालत असल्याची माहिती समोर येताच ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी बारबाला व ग्राहक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अवैध धंद्यांना थारा न देण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश असतानाही ठिकठिकाणी डान्सबार, हुक्का पार्लर तसेच मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री चालत आहे. आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार घेतल्यानंतर या अवैध धंद्यांना पूर्णपणे लगाम लागला होता. मात्र काही महिन्यातच पुन्हा अवैध धंदे पूर्ववत होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यात पहाटे पर्यंत चालणाऱ्या डान्सबारच्या माध्यमातून मोठे अर्थकारण होत आहे.

मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना, भीक मागणाऱ्या मुलीला घरी आणले, काम दिले, लग्नही लावले, पण तिने केले…
बारचालक व अधिकारी यांच्यात समन्वय घडवणाऱ्या तुर्भेतील शेट्टीमार्फत ही माया जमा केली जात असल्याच्याही चर्चा आहेत. अशातच कोपर खैरणे येथील मेट्रो बारमध्ये डान्सबार चालवला जात असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत कोपर खैरणे पोलिसांना माहिती मिळताच शुक्रवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी तिथल्या बारबाला ग्राहकांसोबत अश्लील नृत्य करताना आढळून आल्या.

के चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष राज्यात मुसंडी मारण्याच्या तयारीत, भाजप-सेना आमदार संपर्कात असल्याचा दावा
याप्रकरणी त्यांच्यावर कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील सानपाडा,नेरुळ व इतर ठिकाणी पहाटेपर्यंत चालणाऱ्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. अशा कारवायांमधून शहरात रात्रीच्या वेळी अद्यापही छुपा अवैध धंदा चालत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नवी मुंबई आयुक्त मिलिंद भारंबे अवैध बार चालकांबाबत काय निर्णय घेणार हे येणाऱ्या काळातच समजेल.

नागपूरमध्ये थरार; डीजे वाजवण्यावरून होता जुना वाद, तीन तरुणांनी केला हल्ला, तरुण गंभीर जखमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed