मोगाःफरार खलिस्तानवादी अमृतपाल सिंग याला अटक करण्यात पंजाब पोलिसांना यश आलं आहे. पंजाब पोलिसांनी मोगा येथील गुरुद्वारातून अमृतपालला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. गेल्या कित्येत दिवसांपासून अमृतपालसिंग फरार होता.सुरुवातीला अमृतपालने मोगा पोलिसांना शरण गेल्याचं बोललं जात होतं. मात्र, नंतर पंजाब पोलिसांनी ट्विट करत या वृत्ताचं खंडन केलं आहे. पंजाब पोलिसांच्या ट्विटनुसार, अमृतपाल सिंगला अटक करण्यात आली आहे. मोगा येथील रोडेवाल गुरुद्वारात तो असल्याची गुप्त माहिती पोलिसांना लागली होती. त्यानुसार त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला पोलिसांनी अमृतसर येथे नेले व तिथून आसाममधील डिब्रूगढ जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.
वाचनाच्या गोडीसाठी ‘खाकी’ची धडपड! मुंबईतील सहाय्यक पोलिस निरीक्षक दाम्पत्याकडून मोठं काम
पंजाब पोलिसांच्या ट्विटनुसार, अमृतपाल सिंगला पंजाबमधून मोगायेथून अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिस पुढील माहिती लवकरच जारी करेल. त्याचबरोबर पंजाब पोलिसांनी लोकांना कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नका असं अवाहन केलं आहे.
दरम्यान, पोलिसांनी १८ मार्च रोजी अमृतपाल सिंग आणि त्याच्या ‘वारिस पंजाब दे’ या संघटेनेच्या सदस्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. समाजामध्ये अंसतोष पसरवणे, हत्येचा प्रयत्न, पोलिसांवर हल्ला अशा काही प्रकरणांत अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मुख्यमंत्री होण्याची अजित पवार यांची क्षमता, संजय राऊत यांची प्रतिक्रिया
‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख असलेल्या अमृतपालसिंगविरोधात पंजाब पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली होती. त्यानंतर अमृतपालसिंग आणि त्याच्या साथीदाराला घरात आश्रय देणाऱ्या महिलेलाही पोलिसांनी अटक केली होती.