वारंवार बिबट्याचे हल्ल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. शेतात हल्ला करणारा बिबट्या आता घरात घुसू लागले आहेत. रात्रीची शेतीची कामे कसे करायचे हा प्रश्न आहे. बिबट्याचा वावर पूर्वी होता मात्र आता तो मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माणसांवरही हल्ले वाढल्याने लागले असल्याने वनविभागाने गावोगावी पिंजरे लावावेत, अशी मागणी माजी सरपंच विकास शेळके यांनी केली आहे.
जुन्रर आणि वारजेतही बिबट्याच्या संचारामुळे घबराट
गेल्या काही दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यातही अनेक भागांमध्ये बिबट्यामुळे दहशत पसरल्याचे पाहायला मिळत आहे.काही दिवसांपूर्वीच पुणे शहरातील वारजे परिसरात एका निर्माणाधीन इमारतीमध्ये बिबट्या शिरला होता. यानंतर वनखात्याने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेत या बिबट्याल जेरबंद केले होते. तर जुन्नर तालुक्यात ओतूर परिसरातील बिबट्याने शेतमजुराच्या १२ वर्षीय मुलावर हल्ला केला होता. यामध्ये संजीव बाशिराम झमरे ( वय १२) या मुलाचा मृत्यू झाला होता. जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून घराच्या बाहेर पडावे लागत आहे.
पुण्यातील वारजे भागात फिरणाऱ्या बिबट्याचा पकडण्यात वनविभागाला यश