• Sat. Sep 21st, 2024
दीड मिनिटात यादवला आस्मान दाखवलं, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे सोन्याच्या गदेसाठी भिडणार

प्रसाद शिंदे, अहमदनगर :छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेला कालपासून अहमदनगरमध्ये सुरुवात झाली. जवळपास बाराशे मल्ल या कुस्ती स्पर्धेसाठी हजर झाले आहेत. महाराष्ट्र केसरी २०२३ चा विजेता शिवराज राक्षे याने अवघ्या दीड मिनिटांमध्ये साकेत यादव याला आस्मान दाखवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहेछत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. सोन्याची गदा बक्षीस म्हणून मिळणारी ही देशातील पहिलीच स्पर्धा आहे. २० ते २३ एप्रिल या कालावधीत नगरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या कुस्त्यांचे प्रमुख आकर्षण म्हणजे सिकंदर शेख, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सदगीर, महेंद्र गायकवाड, बाला रफीक यांच्यासह अनेक नामवंत मल्ल कुस्तीसाठी हजर झाले आहेत.

उद्या या स्पर्धेचा समारोप होणार असून छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेच्या विजेत्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोन्याची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे.

ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. अर्धा किलोची सोन्याची गदा म्हणजेच जवळपास ३५ लाख रुपये किमतीचे बक्षीस असलेली ही स्पर्धा आहे. याव्यतिरिक्त एक लाख २५ हजार आणि ५० हजार रुपयांची रोख बक्षिसेही देण्यात येणार आहेत.

पहिल्या ओव्हरमध्ये आला, शेवटच्या ओव्हरमध्ये गेला; कासवछाप इनिंगनं राहुलचा नकोसा विक्रम
स्पर्धेतील विजेत्या मल्लास हॉलमार्क असलेली २४ कॅरेटची अर्धा किलो सोन्याची गदा (किंमत सुमारे ३५ लाख रुपये) जीएसटीच्या बिलासह बक्षीस स्वरुपात देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

शाब्बास रे पठ्ठ्या; बारामतीतील आंतरराष्ट्रीय कुस्ती आखाड्यात महेंद्र गायकवाडने मारले मैदान!

छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र केसरी २०२३ चा विजेता शिवराज राक्षे याने दीड मिनिटांमध्ये साकेत यादव याला आस्मान दाखवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

१२०० पैलवानांसह दिग्गज मल्लांचा सहभाग, छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा,सोन्याच्या गदेचं बक्षीस जाहीर
यानिमित्त नगर शहरातून सकाळी स्पर्धेत सहभागी झालेल्या मल्लांची उंट व घोड्यांवरून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे

पाहा व्हिडिओ :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed