• Sat. Sep 21st, 2024

ट्रकमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या गोण्या, आत जाऊन तपासताच पोलिसही चक्रावले, सापडलं लाखोंचं घबाड

ट्रकमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या गोण्या, आत जाऊन तपासताच पोलिसही चक्रावले, सापडलं लाखोंचं घबाड

धुळेःगुजरातला जात असणाऱ्या ट्रकमध्ये पोलिसांनी छापा मारला. आत तपास करताच मोठं घबाड पोलिसांना मिळालं आहे. गोवा राज्यातून धुळे मार्गे गुजरातला जाणाऱ्या आयशर ट्रक अडवून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.दारू तस्कर दारूची वाहतूक करण्यासाठी अनेक अनोखी शक्कल लढवत आहे. कधी कचऱ्याच्या आडून तर कधी चारा टाकून दारू तस्करी केली जाते. मात्र आता चक्क सॅनिटरी पॅडच्या गोण्यांच्या आडून दारू तस्करी करण्याचा प्रयत्न केला आहे. धुळे पोलिसांच्या सतर्कतेने या दारू तस्करांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सॅनिटरी पॅडच्या आडून होत असलेली दारू तस्करी धुळे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. गोवा राज्यातून धुळे मार्गे गुजरातला जाणाऱ्या आयशर ट्रकमधून लाखो रुपयांचा बियर व दारू साठा जप्त केला असून दोघांना या प्रकरणी अटक केली आहे.

पूर्व -पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा पूल जुलैमध्ये खुला होतोय; ४५ मिनिटांचा वेळ वाचणार
गोवा येथून धुळे मार्गे गुजरात राज्यात मोठा मद्यसाठा जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी लागलीच मुंबई आग्रा महामार्गावरील आवधान शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत संशयित आयशर ट्रक क्रमांक यु.पी. ८० एफ.टी. ९३९८ थांबवून त्यातील मालाबबत विचारपूस केली. त्यावेळेस ट्रकमधील चालकाने आतमध्ये सॅनिटरी पॅडने भरलेल्या गोण्या असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्यावर त्यांनी आयशर ट्रकमधील मालाची तपासणी केली असता त्यांना सॅनिटरी पॅडच्या गोण्या खाली चक्क मोठ्या प्रमाणात बियर व विदेशी दारूचा मद्यसाठा आढळून आला आहे.

१०० वर्षांनंतर अनुभवता येणार दुर्लभ क्षण! हायब्रिड सूर्यग्रहण म्हणजे काय, भारतात दिसणार का?
सदर आयशर ट्रक मध्ये ७ लाख ८१ हजार ८०० रुपये किमतीचे विदेशी दारूचे तब्बल २०५ खोके, ५२ हजार ८०० रुपये किमतीचे बियरचे २० खोके, १२ हजार रुपये किमतीच्या सॅनिटरी पॅडच्या १०० गोण्या व १० लाख रुपये किमतीची आयशर ट्रक, असा एकूण १९ लाख ४४ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी कौतुक केले असून या प्रकरणी अर्जून रामजीत बिंद राहणार शहागंज उत्तर प्रदेश व सोमनाथ नाना कोळी राहणार शिरपूर धुळे या दोघांवर मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस भरतीची लेखी परीक्षा पारदर्शक; खुल्या मैदानावर बैठक व्यवस्था तर 20 पेक्षाही अधिक कॅमेरे तैनात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed