• Mon. Nov 25th, 2024
    लोकल ठाण्याला थांबली, १५ मिनिटं पुढेच जाईना; एक समस्या उद्भवली, शेकडो प्रवाशांना घाम फुटला

    डोंबिवली :मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलमध्ये ठाणे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला. लोकलचे दरवाजे उघडून बंद झाले, मात्र त्यानंतर बराच वेळ बंदच राहिले. भरीस भर म्हणजे गर्दीने भरलेल्या लोकलचे एसीही बंद पडल्याने प्रवाशांना शब्दशः घाम फुटला. ही घटना बुधवारी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास म्हणजेच ऐन पिक अवरला घडली, त्यामुळे त्या लोकलमधील प्रवासी हैराण झाले होते.ठाणे स्थानकात लोकल आल्यापासून १५ मिनिटं झाली, पण सुरू झालेली नव्हती. आधी लोकलचे दरवाजे उघडले आणि त्यानंतर पुन्हा बंद झाल्यावर उघडत नव्हते. त्यातच एसी बंद, फॅन बंद अशी गंभीर अवस्था झाली. आधीच लोकल खचाखच भरली असल्याने श्वास घ्यायला त्रास होत असल्याची प्रतिक्रिया त्या लोकल मधील काही प्रवाशांनी दिली.

    नेमका बिघाड काय झाला, कधी लोकल सुरू होणार याबाबतची माहिती न मिळाल्याने प्रवासी अधिक संतापले असल्याचे सांगण्यात आले. लोकल डब्यातील स्पीकर वरून रेल्वेने तातडीने घडल्या घटनेची माहिती देऊन प्रवाशांना सतर्क करायला हवे होते, पण तसे न झाल्याने अशा सुविधा असून नसल्यासारख्या असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

    १५ वर्षांच्या प्रेयसीने विष पाजल्याचा आरोप, प्रियकराच्या गूढ मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट
    लोकल मधील प्रवाशांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की लोकल वेळेत आली नाही, त्यातच ही गडबड झाल्याने प्रवासी हैराण झाले होते. महिला, युवक, युवती, विद्यार्थी तसेच हजारो चाकरमानी त्या लोकल मधून प्रवास करत होते. रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबद्दल अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

    एसी लोकलचा स्वयंचलित दरवाजा गेल्या १० दिवसांपासून बंद; महिला प्रवाशानं थेट डब्यातूनच व्हिडीओ केला व्हायरल

    लोकल फलाटावर असूनही दरवाजे बंद असल्याने काही करता येत नव्हते. फॅन, एसी सुरू करा आणि मोकळा श्वास घेऊ द्या अशी ओरड करत संताप व्यक्त केला जात होता, मात्र १५ मिनिटांनी बिघाड दुरुस्त झाला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

    आई-अण्णा माफ करा, मी कुठल्या मुलीसाठी नाही, तर… २३ वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed