• Sat. Sep 21st, 2024

दोन सैनिक बर्फात अडकले, वाशिमच्या जवानाने जीवाची पर्वा न करता उडी घेतली, त्यांना वाचवलं पण…

दोन सैनिक बर्फात अडकले, वाशिमच्या जवानाने जीवाची पर्वा न करता उडी घेतली, त्यांना वाचवलं पण…

वाशिम:भारतीय सैन्य दलात पॅराशूट कमांडो म्हणून कार्यरत असलेले वाशिम जिल्ह्यातील सोनखास येथील जवान अमोल गोरे हे भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेश येथे बचाव कार्य करीत असताना शहीद झाले आहेत. उद्या १९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता वाशिम जिल्ह्यातील सोनखास या त्यांच्या मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.दरम्यान, शहीद जवान अमोल गोरे हे देशसेवेसाठी सैन्यदलात दाखल झाले होते. पॅरा कमांडो म्हणून ते कार्यरत होते. याआधी झालेल्या अनेक महत्वपूर्ण अभियानात त्यांनी सहभाग घेऊन देशसेवा केली होती. २४ एप्रिलला ते सुट्टी घेऊन गावी येणार होते. मात्र, त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली आहे. अमोल यांना अवघा ४ वर्षाचा चिमुकला मुलगा असून त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. अमोल सारख्या धाडसी आणि मनमिळावू जवानाच्या शहीद होण्याने वाशिम जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

आठवड्याभरात साताऱ्यातील आणखी एका जवानाला वीरमरण, कर्तव्यावर असताना घडली दुर्दैवी घटना
सोनखास गावातील सुपुत्र अमोल गोरे हो १४ एप्रिलला भारत-चीन सीमेवरील अरुणाचल प्रदेश या ठिकाणी युनिट ११ SF पॅरा सैनिक पेट्रोलिंगमध्ये कर्तव्य बजावत असतांना सोबतचे दोन जवान सकाळी ४ वाजता पहाडीवरुन घसरल्यामुळे बर्फात दबले गेले होते. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान त्या दोन जवानांना वाचवण्यासाठी अमोलने सकाळी ४ वाजता बर्फामध्ये उडी घेतली. मात्र त्यात त्या दोघांना वाचविण्यात यश आलं. पण, जिल्ह्याचे सुपुत्र अमोल गोरे हे सैनिक शहीद झाल्याची माहिती आहे.

जवानांच्या गावावर शोककळा, भारत-चीन सीमेवर रेकी करताना मोरवणे गावचे सुपुत्र अजय ढगळे शहीद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed