गांधीनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री हल्लेखोरांनी पंडित यांच्यावर दगडाने हल्ला केला. मृतदेहावर गंभीर जखमांच्या खुणा असून, नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याने हे प्रकरण गूढ आहे. पंडित हे मणेरमळा रिक्षा स्टॉपचे माजी अध्यक्ष होते आणि रिक्षाचालक म्हणून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला असून, खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
श्वानपथकासह तपास जोरदार
घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करून पुरावे गोळा केले जात आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील संशयितांची चौकशी सुरू असून, हल्लेखोर अद्याप फरार आहेत.
Jalgaon Crime : आजाराने मृत्यू, कागदावर मात्र अपघात; 50 लाखांच्या विम्यासाठी डॉक्टर-पोलीसांनीच रचला कट, 10 जणांवर गुन्हा
पोलिस अधीक्षक कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार, वैयक्तिक वैर किंवा रिक्षा स्टॉपच्या राजकारणाशी संबंधित असण्याची शक्यता तपासली जात आहे. नागरिकांनी संशयास्पद माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
सलग दोन खुनांनी शहर दहशतीत
या घटनेपूर्वी रविवारी सायंकाळी राजारामपुरी मातंग वसाहतीत सख्ख्या भावाच्या हत्येचे प्रकरण घडले होते, ज्यात आरोपीला अटक झाली आहे. एकाच दिवशी घडलेल्या दोन खुनांनी कोल्हापूर शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, स्थानिक रिक्षाचालक आणि नागरिक सुरक्षा वाढवण्याची मागणी करत आहेत. शासनाने गुन्हे नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात करावीत, अशी मागणीही होत आहे.
Pune Crime : ‘मला कट का मारलास?’, तरुणाचा पाठलाग करत जाब विचारला; महिलेने जीवघेणा हल्ला केला, तिघांवर गुन्हा
दरम्यान पोलिस तपासात महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असून, लवकरच आरोपींना पकडले जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
